अमेरिकेचा Pakistan ला धक्का; धोकादायक देश घोषित करणार

Pakistan च्या नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली जाऊ शकते.

84
अमेरिकेचा Pakistan ला धक्का; धोकादायक देश घोषित करणार

अमेरिका (America) पाकिस्तानला (Pakistan) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अनेक दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला अमेरिका धोकादायक देश (Dangerous Country) म्हणून घोषित करणार आहे. यासोबतच पाकिस्तान्यांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली जाऊ शकते. काही देशांच्या सुरक्षा आणि तपासणी जोखमींच्या पुनरावलोकनावर आधारित ही बंदी आहे, असे रॉयटर्सला सूत्रांनी सांगितले आहे. पाकिस्तानच नाही, तर इतर देशांचाही यात समावेश असू शकतो, असे यात म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र विभाग, न्याय, गृह सुरक्षा आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक कार्यालय हे यावर काम करत आहेत.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफळला ; एकाचा मृत्यू, 27 जण जखमी)

हा निर्णय घेण्यापूर्वी अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवासासाठी गाडलाईन जारी केली असून भारत-पाक बॉर्डरवरील (Indo-Pak border) बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा या भागात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानसोबत दहशतवाद आणि सशस्त्र संघर्ष उद्भवण्याची शक्यता या आदेशात वर्तविण्यात आली आहे. या धोक्यांमुळे पाकिस्तानात जाण्याबाबत अमेरिकी नागरिकांनी पुनर्विचार करावा असे वॉशिंग्टनने म्हटले आहे.

दहशतवादी (Terrorist Attack) कोणतीही पूर्वसूचना न देता हल्ले करू शकतात. वाहतूक केंद्रे, शॉपिंग मॉल्स, लष्करी प्रतिष्ठाने, विमानतळ, विद्यापिठे आणि प्रार्थनास्थळे अशा विविध ठिकाणांवर हल्ले करू शकतात. त्यामुळे अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या मेळाव्यांना हजर राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

इस्लामाबादमध्ये अधिक सुरक्षा संसाधने आणि पायाभूत सुविधा आहेत आणि या भागातील सुरक्षा दल देशाच्या इतर भागांपेक्षा आपत्कालीन परिस्थितीला अधिक त्वरित प्रतिसाद देऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव नियंत्रण रेषेवरून, तसेच भारत-पाकिस्तान सीमेवरून प्रवास करू नका. या भागात दहशतवादी गट सक्रीय असल्याचे संकेत मिळत आहेत, असे अमेरिकेने त्यांच्या नागरिकांसाठी प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.