मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते संपन्न झाले.
या मेट्रो उडाणपूल क्र.2 चे प्रमुख वैशिष्टे हे स्थळ एस स्टोन जंक्शन जवळील साई बाबा नगर मेट्रो स्थानकापासून (Sai Baba Nagar Metro Station) सुरु होऊन शिवार गार्डनपर्यंत (Shivar Garden) सुमारे 850 मीटर लांबीचा आहे. या मेट्रो उड्डाणपूलास 21 खांब आहेत. तर पोहोच अप रस्त्याची लांबी 122.6 मिटर तर पोहोच रस्त्याची डाऊन लांबी 15.3 मिटर आहे. उडाणपुलाच्या वाहतूक मार्गाची रुंदी 17 मीटर एवढी आहे. ज्यामध्ये दोन लेन आहेत. यामध्ये सायनेजेस, स्पीड ब्रेकर आणि कॅट आइज तरतूद करण्यात आली. सुरक्षिततेकरिता आरसीसीचे क्रॅश प्रतिबंधक बनविण्यात आले. सुरळीत नेव्हीगेशन परावर्तित चिन्हे, लेन खुणा आणि वेग मर्यादा निर्देशक बसविण्यात आले आहेत. पाणी साचणे टाळण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आली आहे. डाऊन स्ट्रीम रॅम्पवर वाहनाचा वेग नियत्रिंत करण्यासाठी रंबल स्ट्रिप्स (Rumble strips) आणि स्पीड बसविण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफळला ; एकाचा मृत्यू, 27 जण जखमी)
एस स्टोन जंक्शन जवळील साई बाबा नगर मेट्रो स्थानकापासून सुरु होऊन शिवार गार्डन जंक्शन पर्यंत तीन जंक्शनची कोंडी कमी करणे हा या मार्गाचा उद्देश आहे. उडाणपूलामुळे सिग्नलवर होणारी वाहतूकीची गर्दी कमी होईल. तर वाढत्या वाहतूकीच्या मागण्यांना संबोधित करुन एक महत्वपूर्ण पायाभूत सुविधा अपग्रेड म्हणून काम होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community