सरकारी नोकऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया निष्पक्ष असावी ; Supreme Court

47
सरकारी नोकऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया निष्पक्ष असावी ; Supreme Court
सरकारी नोकऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया निष्पक्ष असावी ; Supreme Court

नोकऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक असावी, असे परखड मत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) व्यक्त केले. देशात सरकारी नोकऱ्यांसाठी (government jobs) इच्छुकांची संख्या उपलब्ध नोकऱ्यांपेक्षा अधिक आहे. तरीही, प्रत्येक नोकरी केवळ प्रक्रियेच्या आधारेच भरली जावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. (Supreme Court)

हेही वाचा-Mumbai fire : मुंबईतील मरोळ परिसरात भीषण आग ; ३ जण जखमी, ३ वाहने जळून खाक

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परीक्षेच्या पवित्रतेशी तडजोड करणाऱ्या दोन आरोपींची जामीन रद्द केला. खंडपीठाने म्हटले, ज्यांनी नोकरीसाठी कष्ट केले असे हजारो उमेदवार परीक्षेतील गडबडीमुळे प्रभावित होऊ शकतात. न्यायमूर्ती संजय करोल आणि जस्टिस अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या पीठाने म्हटले, अशा घटनांमुळे सार्वजनिक प्रशासन व कार्यपालिकेवरील लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो. खंडपीठ राजस्थान सरकारच्या (Government of Rajasthan) याचिकेवर सुनावणी करत होते. (Supreme Court)

काय आहे नेमकं प्रकरण ?
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आरोपींना जामीन देण्याच्या आदेशाला आव्हान दिले होते. पीठाने हायकोर्टाचा आदेश रद्द करून आरोपींना दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश दिले. एफआयआरनुसार, आरोपींनी असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल (स्वायत्त शासन विभाग) स्पर्धा परीक्षा-२०२२ मध्ये घोटाळा केला होता. एका आरोपीच्या जागी दुसऱ्या व्यक्तीने डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिली होती. तसेच उपस्थिती रजिस्टरमध्येही फेरफार केला आणि दुसऱ्या व्यक्तीचा फोटो मूळ प्रवेश पत्रावर चिकटवला गेला. पीठाने सांगितले की हजारो उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, पण आरोपींनी त्यांच्या फायद्यासाठी परीक्षेची पवित्रता धोक्यात आणली. त्यामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांवर परिणाम झाला. (Supreme Court)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.