
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम (Champions Trophy Final) सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) निवृत्ती घेणार का ? हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. या प्रश्नाचे उत्तर संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने दिले आहे. दुबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शुभमन गिलला (Shubman Gill) विचारण्यात आले की, रोहित शर्मा निवृत्त होणार आहे का, त्यावर त्याने मोठा खुलासा केला. शुभमन गिल म्हणाला की, ड्रेसिंग रूममध्ये (Indian dressing room) रोहितच्या निवृत्तीबद्दल कोणतीही चर्चा (discussion on retirement) झाली नाही. रोहित याबद्दल विचारही करत असेल असे त्याला वाटत नाही. (Champions Trophy Final)
Irrespective of the result, Shubman Gill is India’s next ODI captain. He confirmed it 😂
— Messi vk Stan (@Im_vkolhi) March 8, 2025
शुभमन गिल पत्रकार परिषदेत म्हणाला की, फायनलपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी कशी जिंकायची यावर चर्चा झाली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल संघाशी किंवा माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. रोहित शर्मा निवृत्तीचा विचार करत असेल असे मला वाटत नाही. सामना संपल्यानंतरच तो त्याचा निर्णय घेईल. सध्या तरी याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. (Champions Trophy Final)
One Final Push ft. Shubman Gill | ICC Champions Trophy 2025 | Final | India vs New Zealand! 💥
One 𝗙𝗜𝗡𝗔𝗟 push 💪🏻
One 𝗙𝗜𝗡𝗔𝗟 stretch 👊🏻
One 𝗙𝗜𝗡𝗔𝗟 time 🙌🏻Let’s do this #TeamIndia 🇮🇳
🎥 VID Credit: @BCCI#ChampionsTrophy #INDvsNZ #NZvIND #INDvsNZFinal pic.twitter.com/zxzxeDeqEn
— 𝐒𝐚𝐧𝐠𝐫𝐚𝐦 ⚚ (@shinewid_SAM) March 9, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कोण जिंकेल? या प्रश्नावर बोलताना गिल म्हणाला, अंतिम सामन्यात जो संघ दबाव चांगल्या प्रकारे हाताळेल तो जिंकेल. सध्याच्या भारतीय संघाकडे सर्वोत्तम फलंदाजी लाइनअप आहे. रोहित आणि विराटसारखे दिग्गज खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, केएल राहुल हे देखील संघात आहेत. (Champions Trophy Final)
हेही वाचा-सरकारी नोकऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया निष्पक्ष असावी ; Supreme Court
शुभमन गिल म्हणाला की, आम्ही आधी आणि नंतर फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहोत. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहोत. आम्ही फलंदाजीचा सराव करतो, मग तो आधी करायचा असो किंवा नंतर. गोलंदाजही अशीच तयारी करतात. मला फक्त अंतिम सामन्यात स्वतःला आणखी थोडा वेळ द्यायचा आहे. (Champions Trophy Final)
हेही वाचा-Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफळला ; एकाचा मृत्यू, 27 जण जखमी
रोहित शर्मा लवकरच 38 वर्षांचा होणार आहे आणि त्याने टी-20 क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. भारताला 2027 मध्ये पुढची मोठी आयसीसी स्पर्धा खेळायची आहे आणि त्यावेळी रोहित सुमारे 40 वर्षांचा असेल, त्यामुळे अशा परिस्थितीत रोहितला पुढे खेळणे कठीण वाटत आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर तो काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. (Champions Trophy Final)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community