Hindu Temple Vandalized : कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिराची तोडफोड; भिंतीवर लिहिले ‘हिंदूंनो परत जा…’

Hindu Temple Vandalized : मंदिरात तोडफोड झाली असून हिंदूंविरोधी घोषणा लिहिल्या आहेत.

104

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सरकार सत्तेत आले आहे. असे असूनही हिंदूंवर हल्ले सुरुच आहेत. कॅलिफोर्नियातील (California) हिंदू मंदिरात तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स (Chino Hills) येथील बीएपीएस हिंदू मंदिराला (BAPS Hindu Temples) लक्ष्य करण्यात आले आहे. लॉस एंजेलिसमध्ये ‘खलिस्तानी जनमत’ (Khalistani public opinion) होणार आहे. त्याच्या काही दिवस आधीच ही घटना घडल्यामुळे या हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा (khalistani terrorist) हात आहे का, अशा चर्चा होत आहेत. (Hindu Temple Vandalized)

मंदिरात तोडफोड झाली असून हिंदूंविरोधी घोषणा लिहिल्या आहेत. मंदिराच्या भिंतीवर ‘हिंदूंनो परत जा’, असे लिहिले आहे. यामुळे आता स्थानिक हिंदूंमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बीएपीएसनेही (BAPS) या घटनेचा विरोध केला आहे, तसेच सखोल अन्वेषणाची मागणी केली आहे. त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर या घटनेविषयी सांगण्यात आले आहे. ‘येथे कधीही द्वेष रुजू देणार नाही. आम्ही शांतता आणि करुणा राखण्यासाठी काम करत राहू’, असे लिहिण्यात आले आहे. तसेच या पोस्टमध्ये आतापर्यंत अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांची यादीच देण्यात आली आहे.

अमेरिकेत आतापर्यंत मंदिरांवर झालेले हल्ले

· ३ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट २०२२ : क्वीन्स, न्यूयॉर्कमधील श्री तुळसी मंदिर
· ३० ऑक्टोबर २०२३ : सॅक्रामेंटोमधील हरी ओम राधा कृष्ण मंदिर
· २३ डिसेंबर २०२३ : नेवार्क, कॅलिफोर्निया मधील SMVS श्री स्वामीनारायण मंदिर
· १ जानेवारी २०२४ : सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथील शिव दुर्गा मंदिर
· ५ जानेवारी २०२४ : फ्रॅमोंट, कॅलिफोर्निया येथील श्री अष्ट लक्ष्मी मंदिर
· ५ जानेवारी २०२४ : हेवर्ड, कॅलिफोर्नियामधील विजयचे शेरावली मंदिर
· ११ जानेवारी २०२४ : डब्लिन, कॅलिफोर्निया येथील श्री पंचमुखा हनुमान मंदिर
· १७ सप्टेंबर २०२४ : BAPS श्री स्वामीनारायण मंदिर मेलविले, न्यूयॉर्क,
· २५ सप्टेंबर २०२४ : सॅक्रामेंटो, कॅलिफोर्निया येथील BAPS स्वामीनारायण मंदिर
· ८ मार्च २०२४ : BAPS टेंपल चिनो हिल्स CA (Hindu Temple Vandalized)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.