मद्रास विद्यापिठात (Madras University) ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?’ या विषयावर एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १०० वर्षांपूर्वीचे मद्रास उच्च न्यायालयाचे (Madras High Court) मुख्य न्यायाधीश आणि एक तमिळ ब्राह्मण एस्. सुब्रमणिया अय्यर (S. Subramania Iyer) यांच्या नावाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्यावी ; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश)
१४ मार्चला हा कार्यक्रम होणार आहे. ख्रिस्ती धर्माचा प्रचार (propagate Christianity) कसा करावा, याविषयी के. सिवा कुमार (K. Shivakumar) हे भाषण करणार आहेत. या व्याख्यानाचे पत्रक सध्या सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. या विरोधात सामाजिक माध्यमांत हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
This does not add any merit to Xianity except to certify it will fraudulently convert not only individuals but also intellectual institutions https://t.co/akwjukDggM
— S Gurumurthy (@sgurumurthy) March 7, 2025
प्रसारित झालेल्या या पत्रकानुसार, विद्यापिठाच्या ‘प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र विभागा’ने सर एस्. सुब्रमणिया अय्यर एंडोमेंट लेक्चरअंतर्गत ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करावा ?’, तसेच ‘हा धर्म का आवश्यक आहे ?’ या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानाचे मुख्य वक्ते अभियंता के. शिवकुमार, (मुख्य अभियंता, भाग्यनगर) असतील. विद्यापिठात ख्रिस्ती अध्ययनासाठी वेगळा विभाग आहे. असे असूनही प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र विभागाने या धार्मिक व्याख्यानाचे आयोजन केले आहे. (Madras University)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community