Pune Crime : गौरव आहूजा, भाग्येश ओसवाला दोघेही पोलिसांच्या ताब्यात; मित्रांनी आणले बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल

80
Pune Crime : गौरव आहूजा, भाग्येश ओसवाला दोघेही पोलिसांच्या ताब्यात; मित्रांनी आणले बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल
Pune Crime : गौरव आहूजा, भाग्येश ओसवाला दोघेही पोलिसांच्या ताब्यात; मित्रांनी आणले बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल

येरवड्याच्या (Yerwada) चौकात लघुशंका करत हटकणाऱ्यांना अश्लिल हावभाव (Pune Crime) करणाऱ्या गौरव आहुजाने (Gaurav Ahuja) साताऱ्यात कराडमध्ये जात पोलिसांना सरेंडर केले आहे. गौरव आहूजा बरोबर असलेला त्याचा मित्र भाग्येश ओसवाला (Bhagyesh Oswala ) येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून तो दारू पीत होता. गौरव आहुजा सोबत असलेल्या भाग्येश ओसवालचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला आहे. भाग्येश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले आहे. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे बाकी आहे. (Pune Crime)

बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल
अशातच सर्व माध्यमांचे आहुजाकडे लक्ष असताना ही जेव्हा घटना घडली तेव्हा गाडीत दारुची बाटली घेऊन बसणारा त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला पोलीस ठाण्यात खाण्यासाठी त्याच्या मित्रांनी बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आणल्याचे समोर आले आहे. भाग्येश अग्रवाल याला रात्री पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एका बॉक्स मध्ये खाण्यासाठी पार्सल मागवले होते. त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी ,बर्गर, कोल्ड्रिंक्स घेऊन ते आले होते. तिघांना हाकलल्यानंतर आणखी एकाने मागाहून येत पोलीस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यालाही पोलिसांनी तेथून जाण्यास सांगितले. (Pune Crime)

व्हिडिओमध्ये गौरव आहुजा काय म्हणाला?
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा माफी मागतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “मी गौरव आहुजा, राहणार पुणे, काल माझ्याकडून जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस प्रशासन आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी.” असं गौरव आहुजा व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. (Pune Crime)

नेमकं प्रकरण काय?
पुण्यात काल (शनिवारी, 9), सकाळच्या वेळेला BMW कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने रस्त्यावरच लघुशंका केली, त्यानंतर एकाने जाब विचारला त्यानंतर त्याने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांसोर अश्लिल चाळे केले होते. यानंतर त्या तरुणाने सिग्नलवर लघुशंका केली. या गाडीत बसलेला हा तरुण मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर त्याने अश्लील चाळे केले. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने निघून गेले. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे. (Pune Crime)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.