Women Health : मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त; धक्कादायक आकडेवारी समोर

89

एका नवीन अहवालात भारतातील महिलांच्या मानसिक आरोग्यातील चिंताजनक स्थिती उघड झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, आत्महत्येतील महिलांचे प्रमाण मोठे आहे. काम-जीवन संतुलन, आर्थिक ताण आणि सामाजिक अपेक्षा यामुळे महिला मानसिक दबावाखाली आहेत, असे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या एमपॉवरने ‘अनव्हीलिंग द सायलेंट स्ट्रगल’ (Unveiling the Silent Struggle) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात महिलांची धक्कादायक स्थिती समोर आली आहे. (Women Health)

(हेही वाचा – Raigad जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढवणे गरजेचे : आदिती तटकरे)

समाजात मानसिक आरोग्याबाबत असलेल्या भीती आणि कलंकामुळे महिला मदत घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे महिलांचे मानसिक आरोग्य गंभीर संकटात आहे. भारतात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ३६.६ टक्के आहे, अशी आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानेही (NCRB) प्रसिद्ध केली आहे. यात १८-३९ वयोगटातील तरुण महिलांचा सर्वाधिक समावेश आहे.

यात ५० टक्के महिला कामाचे-आयुष्याचे संतुलन, आर्थिक दबाव आणि सामाजिक अपेक्षांमुळे तणावाखाली आहेत, तर ४७ टक्के महिलांना झोप न येण्याची समस्या आहे. विशेषतः १८-३५ वयोगटातील महिलांचा यात समावेश आहे. तसेच ४१ टक्के महिलांना भावनिकदृष्ट्या एकाकीपणा जाणवत आहेत. त्यासोबतच ३८ टक्के विद्यार्थिनी आणि नोकरदार महिला करिअरची वाढ आणि आर्थिक स्थिरतेबद्दल चिंतेत आहेत.

महाराष्ट्र शासनासोबतच्या ‘प्रोजेक्ट संवेदना’ (Project Samvedana) अंतर्गत १२.८ लाख ग्रामीण महिलांवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे दिसून आले की, आर्थिक अस्थिरता, सामाजिक कलंक आणि मानसिक आरोग्य सेवांच्या कमतरतेमुळे त्या गंभीर नैराश्य आणि चिंतेने ग्रस्त आहेत. तसेच ४२ टक्के महिलांमध्ये नैराश्य आणि चिंता यांची लक्षणे आढळली. त्या सोबतच ८० टक्के महिलांना मातृत्व रजा आणि करिअरच्या वाढीमध्ये भेदभाव सहन करावा लागतो. ९० टक्के महिलांचे म्हणणे आहे की, मानसिक आरोग्य समस्यांचा त्यांच्या कामाच्या कामगिरीवर परिणाम होतो. (Women Health)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.