Bandhan Bank Share Price : बंधन बँकेच्या शेअरमध्ये एका आठवड्यात १० टक्क्यांची वाढ

Bandhan Bank Share Price : तिमाही निकालांनंतर बंधन बँकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे.

108
Bandhan Bank Share Price : बंधन बँकेच्या शेअरमध्ये एका आठवड्यात १० टक्क्यांची वाढ
  • ऋजुता लुकतुके

बंधन बँक ही देशातील एक आघाडीची खाजगी बँक आहे आणि शेअर बाजाराचा आढावा घेतला तर या शेअरने मागच्या महिन्याभरात अक्षरश: रोलरकोस्टर राईड अनुभवली आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीचे डिसेंबर तिमाहीतील निकाल जाहीर झाले. ते चांगले असूनही कंपनीच्या शेअरमध्ये जवळ जवळ २० टक्क्यांची पडझड झाली. पण, त्यानंतर मात्र मार्च महिन्यात शेअर सावरतोय आणि या आठवड्यात तर शेअरने १० टक्क्यांची तेजी पाहिली आहे. (Bandhan Bank Share Price)

निराशाजनक तिमाही निकालांनंतरची मरगळ या शेअरने पुसून टाकलेली दिसत आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर ०.३९ अंशांनी वर १४९ वर होता. पण, आठवड्याभराचा अंदाज घेतला तर यात तब्बल ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. फक्त इतकंच नाही तर वित्तीय क्षेत्रात सध्या ही कंपनी काही संशोधन संस्थांची टॉप पिक आहे. त्याचाही फायदा शेअरला मिळत आहे. (Bandhan Bank Share Price)

(हेही वाचा – Radhika Merchant Net Worth : अंबानी कुटुंबाची नवीन सून राधिका मर्चंट आहे ‘इतक्या’ कोटींची धनी)

New Project 2025 03 09T144011.452

कंपनीच्या तिमाही निकालातच या वित्तीय वर्षांची अपेक्षा सामावलेली असते. ते पाहता, बँकेच्या निव्वळ नफ्यात मोठी घट झाली आहे. पण, त्याचवेळी तिमाही निकालातून समोर आलेल्या दोन सकारात्मक गोष्टींनाही गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिलेला दिसत आहे. (Bandhan Bank Share Price)

बंधन बँकेचा एनपीए म्हणजे बुडित खाती ४.६८ टक्क्यांवर आली आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण तब्बल ७.६२ टक्के इतकं होतं. तर नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच एनआयआय तब्बल १७ टक्क्यांनी वाढून ५,४७९ कोटींवर पोहोचली आहे. याचाच अर्थ कंपनीने कर्ज वसुलीच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. शिवाय रिझर्व्ह बँकेनं अलीकडे रेपो दरात केलेली कपातही बँकेच्या पथ्यावर पडली आहे. सर्व बँक शेअरना त्यामुळे फायदा मिळाला आहे. भविष्यात रेपो दर आणखी कमी झाले तर वित्तीय क्षेत्रात पुन्हा एकदा तेजी पसरू शकते. (Bandhan Bank Share Price)

बंधन बँकेच्या शेअरमध्ये मागच्या ५ वर्षांत तब्बल ६५ टक्क्यांची घसरण झाली आहे आणि तेव्हापासून या शेअरमध्ये मोठे चढ उतार होत आहेत. या शेअरचा वर्षांतील उच्चांक हा गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यातील २३२ रुपये इतका होता. तर वर्षातील निच्चांकी पातळी याच वर्षी १३ जानेवारीची १३७ रुपये इतकी आहे. म्हणजेच वर्षभरात शेअरमध्ये ३७ टक्क्यांची घसरण झाली आहे. (Bandhan Bank Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे आणि गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरमध्ये खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.