America मध्ये हिंदू मंदिराची तोडफोड; भारत सरकारने कारवाई करण्याची मागणी करत केली नाराजी व्यक्त

64
America मध्ये हिंदू मंदिराची तोडफोड; भारत सरकारने कारवाई करण्याची मागणी करत केली नाराजी व्यक्त
America मध्ये हिंदू मंदिराची तोडफोड; भारत सरकारने कारवाई करण्याची मागणी करत केली नाराजी व्यक्त

अमेरिकेत (America) पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर (Hindu temple) हल्ला झाला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील (California) बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (BAPS) मंदिराची तोडफोड करण्यात आली, तसेच भारतविरोधी मजकूर लिहून मंदिराला अपवित्र करण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेवर आता भारताने नाराजी व्यक्त करत यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

( हेही वाचा : Women Health : मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त; धक्कादायक आकडेवारी समोर

बीएपीएस संस्थेने ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे. BAPS ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, कॅलिफोर्नियातील (California) चिनो हिल्स येथील आणखी एका मंदिराच्या विटंबना. हिंदू (Hindu) समुदाय या द्वेषाच्या विरोधात ठामपणे उभा आहे. चिनो हिल्स आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील समुदायासोबत, आम्ही द्वेषाला कधीही मुळ धरू देणार नाही. समान मानवता आणि श्रद्धा हे शांती आणि करुणा कायम प्रयत्न करत राहील.

या घटनेची नोंद घेत भारताने देखील निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) म्हणाले की, आम्ही कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथे एका हिंदू मंदिरात (Hindu temple) झालेल्या तोडफोडीच्या नोंद घेतली आहे. अशा द्वेषपूर्ण कृत्याचा आम्ही तीव्र शब्दात निंदा करतो. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आणि पूजा स्थळांची योग्य सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन करतो. दरम्यान, याआधी देखील अमेरिकेत हिंदू मंदिरांची (Hindu temple) तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली होती. मंदिरांवर हिंदू नागरिकांच्या विरोधातील संदेश लिहिण्यात आले होते. (America)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.