Champions Trophy Final 2025 : न्यूझीलंडला तिसरा झटका ! विल यंग, रवींद्र बाद

Champions Trophy Final 2025 : न्यूझीलंडला दुसरा झटका ! विल यंग, रवींद्र बाद

40
Champions Trophy Final 2025 : न्यूझीलंडला तिसरा झटका ! विल यंग, रवींद्र बाद
Champions Trophy Final 2025 : न्यूझीलंडला तिसरा झटका ! विल यंग, रवींद्र बाद

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ट्रॉफी जिंकण्यासाठी महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस सुरू आहे. रचिन रवींद्रला दोनदा जीवदान मिळालं. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं. मात्र अखेर रचिन रवींद्रची विकेट गेली.

वचपा काढण्याची वेळ आली
रचिन रवींद्रचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याच्या एकाच षटकात १६ धावा ठोकल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार मारला. सन २००० मध्ये या दोन्ही देशांमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचाच सामना पार पडला होता. त्यावेळी किवींनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आता भारत २५ वर्षांनी हिशोब चुकता करणार का? याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. भारताने याआधी २०१३ ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळविला होता, त्यानंतर निर्माण झालेला जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचीदेखील हीच योग्य वेळ आहे. २०१९ च्या वनडे विश्वविजेतेपदापासून भारत दूर राहिला तो न्यूझीलंडमुळेच. या संघाने भारताला उपांत्य फेरीत लोळवून स्वप्नभंग केला होता. भारताने या पराभवाचा वचपा नंतर २०२३ च्या वनडे विश्वचषकात न्यूझीलंडला उपांत्य सामन्यातच नमवून काढला. त्याआधी २०२१ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मात्र फायनलमध्ये भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाला, मागच्यावर्षी कसोटी मालिकेतही न्यूझीलंडने भारताला भारतात ३-० ने ‘क्लीन स्विप’ दिला. (Champions Trophy Final)

खेळपट्टी कशी असेल ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ज्या खेळपट्टीवर खेळला गेला होता तीच खेळपट्टी भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली असेल. फलंदाजांसाठी कठीण समस्येचा सामना करावा लागेल. फलंदाजांना येथे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. खेळपट्टी संथ असेल, फिरकीपटूंना येथे चांगली मदत मिळेल. वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करु शकतात. जरी येथे धावांचा पाठलाग करणे फार कठीण नसले तरी, जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 290-300 धावा केल्या तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला लक्ष्य गाठणे खूप कठीण होईल. (Champions Trophy Final)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.