Raj Thackeray यांच्या ‘त्या’ विधानावर चौफेर टीका

157
Raj Thackeray यांच्या 'त्या' विधानावर चौफेर टीका
Raj Thackeray यांच्या 'त्या' विधानावर चौफेर टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षाच्या 19 व्या वर्धापन दिनाचा मेळावा दि. ९ मार्च रोजी पार पडला. पुण्यातील चिंचवडमधील रामकृष्ण सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कुंभमेळा आणि गंगा नदीतील पाण्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्याच्या या विधानाचा भाजपा आमदार तथा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

( हेही वाचा : America मध्ये हिंदू मंदिराची तोडफोड; भारत सरकारने कारवाई करण्याची मागणी करत केली नाराजी व्यक्त

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “मुंबईला मेळावा बैठक लावली होती. काहीजण आजारी होते म्हणून आले नव्हते. त्यातील ५-६ जणांनी सांगितलं की कुंभला गेले होते. मी म्हटलं गधड्यांनो करता कशाला पापं? मी हेही विचारलं की आल्यावर अंघोळ केलीत ना…? हे बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar) छोट्याश्या कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. मी हड म्हटलं, मी नाही घेणार.” असे म्हणत ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानासंदर्भात खिल्ली उडवल्याचे आढळले. त्यात ठाकरे पुढे म्हणाले की, लोक कुंभमेळ्यात गर्दी करत अंघोळी करत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा.अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्याने राज ठाकरेंना हिंदू विरोधाची लागण – तुषार भोसले

त्यासंदर्भात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) म्हणाले की, उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्याने राज ठाकरेंना (Raj Thackeray ) हिंदू विरोधाची लागण झालेली आहे. हिंदू धर्मियांना पवित्र असणाऱ्या गंगाजलाची ठाकरेंनी ज्या प्रकारे सार्वजनिक खिल्ली उडवली. त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झाला आहे, असे भोसले म्हणाले. तसेच गंगाजल तुम्हाला पिण्यायोग्य वाटत नसेल तर तो गंगा कलश मस्तकी लावून त्याचे दर्शन घ्यायला हवे होते. त्यामुळेच तुमच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची जनता तुम्हाला नाकारते, असा टोलाही तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) लगावला.

कुंभमेळ्यात स्नान करणे ही आमची श्रद्धा- मंत्री गिरीश महाजन

दरम्यान भाजपा नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, कुंभमेळ्यात स्नान करणे ही अंधश्रद्धा नाही, ही आमची श्रध्दा आहे. शेकडो वर्षांपासून हे सुरू आहे. या गोष्टीला एक धार्मिक अधिष्ठान आहे. गंगेत प्रदूषण आहे, घाण पाणी होतं असे समजण्याचे कारण नाही. एकाच वेळी कोट्यावधी लोक आल्यानंतर थोड्याफार प्रमाणावर प्रदूषणाचा प्रश्न उद्भवतो. नाशिकच्या गोदावरित दूषित पाणी येत. मात्र, आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय. सीवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू करतो आणि पाणी शुद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण कुंभमेळ्याच्या दरम्यान एक अमृत स्नानात लाखो लोक येऊन डुबकी मारणे ही सर्वांची श्रद्धा आहे. धार्मिक स्थान आहे परंपरा आहे, राज ठाकरें यांचे मत वेगळे असू शकतं. ही काही अंधश्रद्धा जादूटोणा नाही. राज ठाकरे प्रदूषणाच्या बाबतीत जे म्हणाले त्याबाबतीत पुरेपूर काळजी आम्ही नाशिकला घेणार आहोत, असेही महाजन म्हणाले.

घरी बसून पाणी अस्वच्छ असे म्हणणे चुकीचे – राम कदम

तसेच राम कदम म्हणाले की, मी स्वतः माझ्या कुटुंबासमोर तीन वेळेस कुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती, साधू-संत सगळेच लोक त्या ठिकाणी पवित्र स्नानासाठी गेले. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, देशभरातील 57 कोटी लोक त्या संगमावर आले. तिथले पाणी स्वच्छ होते. त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असे म्हणणे चुकीचे आहे. त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असा पलटवार त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलाय.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.