Water Tank साफ करताना 5 कामगारांचा मृत्यू

90
मुंबईतील नागपाडा परिसरात पाण्याची टाकी (Water Tank) साफ करताना ५ स्वच्छता कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे, रविवारी, ९ रोजी दुपारी जवळपास साडे बारा वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
बांधकामाधीन इमारतीच्या (खासगी) पाण्याच्या टाकीचे (Water Tank) ५ कामगार साफसफाई करत होते. त्यावेळी गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तात्काळ जे.जे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्या पाचही कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगितले. जे.जे रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांकडून ही माहिती देण्यात आली आहे. मिंट रोड, नागपाडा या ठिकाणी कामगारांच्या मृत्यूची ही दुर्दैवी घटना घडली. मृत ५ कामगारांची नावे आणि इतर तपशीलवार माहिती अद्याप मिळालेली नाही. (Water Tank)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.