भारतीय ओळखपत्र (indian identity card) प्राप्त करून राज्याच्या विविध भागांत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या (bangladeshi infiltrators) पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तब्बल २२३७ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ५२७ जणांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी लेखी उत्तरात दिली. बनावट कागदपत्रांच्या आधारे – ओळखपत्रे तयार करणाऱ्या ७ भारतीय नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा : Hawkers : वाह रे महापालिका; स्टेशनजवळ फेरीवाल्यांचे धंदे जोरात, पण पुढे कारवाई)
बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याबाबत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही माहिती दिली. जानेवारी २०२५ मध्ये मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, सोलापूर व नाशिक जिल्ह्यांमध्ये दहशतवाद विरोधी पथक व पोलिसांनी ३७ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यांत १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई शहर व उपनगरात १८ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान २५१ बांगलादेशी नागरिकांना अटक केली, तर १७ जणांना बांगलादेशात हद्दपार केले. तसेच, एका बांगलादेशी (bangladeshi infiltrators) महिलेचे प्रत्यार्पण केले आहे.
पुणे जिल्ह्यातील मौजे थेऊर येथे हारुलाल पंचानन विस्वास, रोहीत राजकुमार विस्वास (Rohit Rajkumar Biswas) आणि सुकुमार पंचानन बिस्वास (Sukumar Panchanan Biswas) या बांगलादेशींनी जमीन खरेदी केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी थेऊरचे मंडल अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community