-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील गोरेगावमधील वाढत्या फेरीवाल्यांविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असतानाच मागील तीन ते चार दिवसांपासून फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई केली जात आहे. गोरेगाव पूर्व आणि गोरेगाव पश्चिम येथील भागांमधील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून गोकुळधामधील वाढत्या फेरीवाल्यांना संरक्षण देण्यावरून महापालिकेचे अधिकाऱ्यांविरोधात स्थानिक जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असतानाच ही कारवाई प्रशासनाने हाती घेतली आहे. परंतु ही कारवाई केवळ विधीमंडळ अधिवेशनापुरती राहता पुढेही कायम राहावी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (Hawker Action)
मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्यावतीने मागील चार ते पाच दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ परवाना अधिकारी नुतन जाधव आणि इतर अधिकारी यांनी गोरेगाव पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्ग, जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, मालाड ईस्ट, कृष्णवाटिका रोडवरील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करून जिथल्या तिथेच लाकडी बाकडे, टेबल, स्टॉल्स हे जेसीबीच्या मदतीने चक्काचूर करून त्यांची नासधूस केली जाते. त्यामुळे फेरीवाल्यांचे साहित्य जप्त न करता त्यांची नासधुस केली जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करून त्यांचे साहित्य नष्ट केले जात असल्याने एकप्रकारे समाधान व्यक्त केले जात आहे. (Hawker Action)
(हेही वाचा – Hawkers : वाह रे महापालिका; स्टेशनजवळ फेरीवाल्यांचे धंदे जोरात, पण पुढे कारवाई)
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील कृष्णवाटिका रोड, साई नगर, मोहन गोखले मार्ग, फिल्मसिटी, आरे भास्कर रोड आदी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात फेरीवाले बसत असून यांनी रस्ते व पदपथ अडवून ठेवल्याने स्थानिक रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. स्थानिकांच्या मागणीनुसार स्थानिक भाजपाच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिकेकडे कारवाईची मागणीही केली होती. परंतु त्यानंतरही ही कारवाई केली जात नसल्याने त्यांनीही तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे गोकुळधा परिसरात पुन्हा एकदा कारवाई जोरात सुरु केल्याने विभागातील रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (Hawker Action)
याबाबत माजी नगरसेविका यांनी सोशल मिडियाद्वारे व्हिडीओ व्हायरल करत या कारवाईबाबत सहायक आयुक्त संजय जाधव यांचे धन्यवाद मानले आहे. त्या पुढे अशा म्हणतात की, गोकुळधाम परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करूनही आपण कायमच दुर्लक्ष केले. परंतु आता विधीमंडळ अधिवेशन सुरु असल्याने त्याच्या भीतीने महापालिकेने ही कारवाई हाती घेतली आहे. त्यामुळे ही कारवाई अधिवेशनापुरतीच न राहता ती पुढेही कायम ठेवली जावी असे सांगत सातम यांनी ही कारवाई सातत्य पूर्ण राहावी यासाठीही महापालिकेच्या पी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Hawker Action)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community