ICC Champions Trophy च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी न्यूझीलंड संघाने २५२ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना झटपट विकेट गमावले पण डॅरिल मिचेल आणि ब्रेसवेलच्या अर्धशतकाने किवी संघाने झुंज देण्याइतकी मोठी धावसंख्या उभारली आहे. आता भारतीय संघ कशी फलंदाजी करणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
(हेही वाचा धर्मांतर करणार्यांना मृत्यूदंडाची तरतूद करणार; Madhya Pradesh च्या मुख्यमंत्र्यांची घोषणा)
ICC Champions Trophy या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा ऐतिहासिक सामना खेळवला जात आहे. गट टप्प्यातील सामन्यांनंतर हे दोन्ही आता दुसऱ्यांदा अंतिम फेरीत भिडत आहेत. याआधी भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्याचबरोबर हे दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ICC Champions Trophy इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. मोहम्मद शमीच्या ४६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर डॅरिल मिचेल रोहित शर्माकरवी झेलबाद झाला. मिचेलने या षटकात दोन चौकार लगावले होते पण अखेरीस तो झेलबाद झाला. मिचेल १०१ चेंडू खेळत ३ चौकार लगावत ६३ धावा करत बाद झाला.
Join Our WhatsApp Community