Congress : अनंत गाडगीळ यांचा काँग्रेसला घरचा अहेर; राज्यातील पक्ष संघटनेवर केला हल्लाबोल

पक्षाने आता रस्त्यावर येण्याची गरज आहे. सोशल मीडियातून निवडणूक जिंकता येत नाही. रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतील, असे अनंत गाडगीळ म्हणाले.

56

सध्या राज्यातील पक्ष संघटनेकडून काँग्रेस (Congress) पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला योग्य माहिती दिली जात नाही, राज्यातील संसदीय समितीचेही काम परिणामकारक नाही, राज्यातील पक्ष संघटनेकडून चुकीचे निर्णय घेतले जात आहेत, अशा आशयाचे एका मागोमाग एक आरोप करत काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी काँग्रेसला घराचा अहेर दिला, राज्यातील पक्ष संघटनेवर हल्लाबोल केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनंत गाडगीळ बोलत होते.

माझ्याविषयी दिल्लीत चुकीची माहिती दिली 

मी लहान असल्यापासून कॉँग्रेस (Congress) पक्ष पाहत आहे. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या काळात कॉँग्रेसच्या राज्यातील संसदीय समितीची बैठक 4-5 दिवस सुरू असायाची. त्यामध्ये प्रत्येक उमेदवार, मतदारसंघ यावर चर्चा चालायची, पण गेल्या 6-7 वर्षांत मी पाहतोय आता ही बैठक कधी 2 तासांत, कधी एक दिवसात संपते. उदाहरण म्हणून पुण्याचा मतदारसंघ पहा. जेथून माझे आजोबा आणि वडील लाख लाख मतांनी निवडून यायचे, त्या मतदारसंघात मी निवडून येणार नाही असे राज्याच्या लोकांनी दिल्लीत चुकीचे सांगितले. मी परवा दिल्लीत कॉँग्रेस कार्यालयात गेलो होतो, तेव्हा मला काही जणांनी हे सांगितले, मला याचे दुःख वाटले. पण ज्यांनी दिल्लीत माझ्याविषयी असे सांगितले त्यांनी ज्याला तिकीट दिले तो पराभूत झाला, त्याच्यानंतर त्यालाच पुनः विधान परिषदेत उभे केले. याचा अर्थ केंद्रीय नेतृत्वाला राज्याकडून योग्य माहिती दिली जात नाही, असे माझे स्पष्ट मत आहे, असा गौप्यस्फोट कँग्रेस (Congress) नेते अनंत गाडगीळ यांनी केला.

(हेही वाचा ५ वर्षात राज्यातून २, २३७ बांगलादेशींना अटक; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची माहिती)

मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जाते

दिल्लीतील काँग्रेस (Congress) कार्यालयात गेलो होतो तेव्हा एकाने मला विचारले की, अरे तुम्ही इथे कसे? आम्ही ऐकले तुम्ही पक्ष सोडला, हे ऐकूनही मला फार वाईट वाटले. मी त्यांना सांगितले की, मी कधीच पक्ष सोडणार नाही. माझ्यावर अन्याय झाला तरी मी पक्ष सोडला नाही, शंभर वर्षे माझे घर पक्षाशी प्रामाणिक राहिले आहे, असेही गाडगीळ म्हणाले. मी परवा पुण्यात युवक कॉँग्रेसच्या (Congress) कार्यक्रमात हजर होतो, त्यावेळी मी व्यासपीठावर होतो, पण काही वर्तमानपत्रांनी माझे नाव वगळून सगळ्यांची नावे छापली, हे जणीवपूर्वक होत आहे. म्हणजे पुण्याच्या राजकारणातून मी बाहेर गेलो असे दाखवण्याचा हा प्रयत्न असतो. हे माझ्याबद्दल जाणीवपूर्वक चालले आहे, पण आता  मला टार्गेट केले जात आहे. 2014 चे उदाहरण आहे. सोनिया गांधी यांच्याकडे जेव्हा महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदार निवडण्याविषयीचा प्रस्ताव गेला होता, तेव्हा सोनिया गांधींनी माझे कौतुक करत माझे नाव सुचवले होते. मला याचा आनंद होता, असे सांगत पक्षाने आता रस्त्यावर येण्याची गरज आहे. सोशल मीडियातून निवडणूक जिंकता येत नाही. रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतील, असेही गाडगीळ म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.