BMC Women’s Cricket League 2025 चा विजेता ठरला ‘ई’ विभागाचा संघ

334
BMC Women's Cricket League 2025 चा विजेता ठरला 'ई' विभागाचा संघ
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महिला कर्मचाऱ्यांमधील सांघिक भावना वाढावी, या आदेशाने आयोजित केलेल्या ‘बीएमसी वुमेन्स क्रिकेट लीग २०२५’ (BMC Women’s Cricket League 2025) च्या या लीगमध्ये महानगरपालिकेच्या ई विभागाच्या संघाने विजेतेपद पटकावले. तर रॉकिंग वॉरियर्स लायसेन्स या संघाला उपविजेते मिळाले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या विधी विभागाने माटुंगा येथील खालसा महाविद्यालयाच्या टर्फवर ‘बीएमसी वुमेन्स क्रिकेट लीग २०२५’ (BMC Women’s Cricket League 2025) चे शनिवारी ८ मार्च २०२५ रोजी आयोजन केले. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

(हेही वाचा – Congress : अनंत गाडगीळ यांचा काँग्रेसला घरचा अहेर; राज्यातील पक्ष संघटनेवर केला हल्लाबोल)

महिला क्रिकेटपटू व क्रिकेटप्रेमींना मार्गदर्शन करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी म्हणाले की, या स्पर्धेचा मुख्य उद्देश महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे हा आहे. मुंबई महानगरपालिकेने या स्पर्धेद्वारे महिला सशक्तीकरणाला, सांघिक भावनेला चालना दिली आहे, असे त्यांनी नमूद केले.

उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, उप आयुक्त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर , उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त सुरेश सागर, सहायक आयुक्त नितीन शुक्ला, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांचे स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य लाभले. (BMC Women’s Cricket League 2025)

(हेही वाचा – Budget Session 2025 : सत्ताधाऱ्यांचे मिशन; ‘टार्गेट आदित्य’)

मुंबई महानगरपालिकेच्या विधी विभागातील उपकायदा अधिकारी माधुरी मोरे व टीबीची ग्रुप यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न केले. या स्पर्धेला महिला क्रिकेटपटू आणि क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी महिला खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्यातील खिलाडूवृत्तीचे आणि संघटनात्मक कौशल्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. एकूण २२ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.

ई विभाग संघ ठरला विजेता

या स्पर्धेत ‘ई’ विभाग महिला संघाने विजेतेपदाचा चषक पटकावला. तर रॉकिंग वॉरियर्स लायसेन्स या संघाला उपविजेते मिळाले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. (BMC Women’s Cricket League 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.