surmai fish : खमंग चमचमीत सुरमई घरच्या घरी बनवण्यासाठी सोपी रेसिपी!

25
surmai fish : खमंग चमचमीत सुरमई घरच्या घरी बनवण्यासाठी सोपी रेसिपी!

सुरमई हा हिंदी महासागरामध्ये आढळणारा स्थानिक मासा आहे. सुरमईला इंडो-पॅसिफिक किंग मॅकरेल किंवा सीर फिश असंही म्हणतात. सुरमई हा केरळ इथला सर्वांत लोकप्रिय मासा आहे. दक्षिण केरळ इथे सुरमईला ‘नेमीन’, उत्तर केरळ इथे ‘ऐयकुरा’ आणि तामिळनाडू इथे ‘वंजाराम’ असंही म्हणतात. (surmai fish)

(हेही वाचा – Filmcity परिसरात १५ दिवसांत दुसऱ्यांदा आग; परिसरात सर्वत्र अनधिकृत वखारींचा सुळसुळाट)

सुरमई खाण्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात?

सुरमईमध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात, कार्बचं प्रमाण कमी असतं, भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात आणि आवश्यक ते फॅटी ऍसिड्स असतात. सुरमईमध्ये प्रोटिनचं प्रमाण भरपूर असतं. याबरोबरच त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरसचंही भरपूर प्रमाण असतं. सुरमई माशामध्ये सोडियमचं प्रमाण हे नगण्यचं असतं. सुरमईमध्ये ओमेगा-३-फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन बी१२ आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असतं. (surmai fish)

आज आम्ही तुम्हाला सुरमईची लोकप्रिय आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात…

(हेही वाचा – Congress : अनंत गाडगीळ यांचा काँग्रेसला घरचा अहेर; राज्यातील पक्ष संघटनेवर केला हल्लाबोल)

सुरमई रवा फ्राय रेसिपी

सुरमई हा तळण्यासाठी एक परिपूर्ण मासा आहे. त्यात चरबीचं प्रमाण असतं, त्याला उग्र वास नसतो, आणि कमी काटे असतात. सुरमईला किंगफिश देखील म्हणतात. सुरमई तळताना त्याचे मोठे तुकडे हाताळणे सोपे जाते.

सुरमई ताजी आहे की नाही, हे तपासण्यासाठी ती अंगठ्याने दाबा. जर ती मऊ दिसत असेल आणि दाबलेला भाग त्याच दबलेल्या स्थितीत राहिला तर ती ताजी नसेल. (surmai fish)

(हेही वाचा – Budget Session 2025 : सत्ताधाऱ्यांचे मिशन; ‘टार्गेट आदित्य’)

  • सुरमई रवा फ्राय तयार करण्यासाठी माशाचे मध्यम ते मोठ्या आकाराचे पातळ काप करून घ्या. माशाचे काप पातळ असतील तर त्यांत मसाल्यांची चव चांगल्याप्रकारे मुरते.
  • सुरमई चविष्ट लागण्यासाठी दोनदा मॅरीनेट करावे. सर्वांत आधी मीठ, हळद आणि लिंबाचा रस लावून १० मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे माशाची मूळ चव तयार होईल. मीठ आणि लिंबाचा रस सुरमईच्या कापांमध्ये शोषला जाईल आणि खारट-तिखट असं चवीचं एक मिश्रण तयार होईल. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. हळदीमुळेच माशांमध्ये बॅक्टेरिया तयार होण्याची प्रक्रिया संथ होते आणि माशाची चव वाढते.
  • दहा मिनिटे पूर्ण झाल्यावर दुसऱ्यांदा मॅरीनेट करताना माशांच्या कापांना आलं-लसूण-मिरची पेस्ट, लाल तिखट इत्यादी. आपल्या आवडीनुसार मसाले लावून घ्यावे. ते काप पुन्हा १० मिनिटे झाकून ठेवावे. मासे अगदी कमी वेळात चांगले मॅरीनेट होतात.
  • त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे तुकडे तळणे होय. सुरमईच्या कापांना कोटिंग करण्यासाठी रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून घ्यावं. रवा आणि तांदळाच्या पिठामुळे सुरमईचे काप कुरकुरीत तळले जातात. (surmai fish)
  • सुरमईचे काप तळण्यासाठी तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी वापरात असलेलं कोणतंही तेल घ्या. त्यानंतर सुरमई शॅलो फ्राय करण्यासाठी तवा किंवा फ्राईंग पॅनचा वापर करा.
  • तव्यावर तेल पुरेसं चांगलं गरम होऊ द्या. जेणेकरून सुरमईचे काप तव्यावर चिकटणार नाहीत. पण ते काप करपणार नाही याचीही काळजी घ्या. त्यासाठी मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी ५ ते ७ मिनिटे चांगले सोनेरी/ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. सुरमईचे जास्त काप घालून तव्यावर गर्दी करू नका.
  • सुरमईचे काप व्यवस्थित तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. प्लेट सजवण्यासाठी तुम्ही लिंबाचे तुकडे किंवा पातळ काप आणि कांद्याच्या रिंग्ज वापरू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.