उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभादरम्यान नद्यांचे पाणी स्नान करण्यायोग्य होते, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Central Pollution Control Board, सीपीसीबी) राष्ट्रीय हरित लवादाला (एनजीटी) सांगितले आहे. नुकतेच प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात ६२ कोटी लोकांनी अमृतस्नान केले. त्यामुळे गंगा आणि यमुना यांच्या पाण्याची गुणवत्ता घसरली होती आणि ती स्नान करण्यालायक राहिली नव्हती, असे दावे केले जात होते. (Prayagraj Kumbh mela 2025)
(हेही वाचा – Local Body Elections : खासदार हवा, आमदार हवा, मग नगरसेवक का नको?)
यापूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गंगा (Ganga) व यमुना नद्यांच्या पाण्यात मानवी विष्ठेतील जीवाणू उच्च प्रमाणात आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र सांख्यिकी विश्लेषणानुसार संगमाचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य होते, असे नवीन अहवालात म्हटले आहे.
असे घेतले होते पाण्याचे नमुने
नद्यांच्या पाण्यांच्या नमुन्यांमध्ये विविधता असल्यामुळे सांख्यिकी विश्लेषण करण्यात आल्याचे ‘सीपीसीबी’ने म्हटले आहे. हे नमुने वेगवेगळ्या तारखांना समान स्थानांवरून आणि एकाच दिवशी विविध स्थानांवरून अशा भिन्न पद्धतींनी घेण्यात आले होते. त्यामुळे त्यामध्ये नदीच्या पाण्याची एकंदर गुणवत्ता प्रतिबंबित झाली नव्हती, असा दावा नवीन अहवालात करण्यात आला आहे. ‘सीपीसीबी’ने हा अहवाल २८ फेब्रुवारीला तयार केला आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतेच कुंभमेळ्यातील स्नानावर आणि गंगा नदीच्या पाण्यावर टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले, “पक्षाचे पदाधिकारी कुंभला गेले होते. गधड्यांनो पाप कशाला करता ? बाळा नांदगावकर छोट्याशा कमंडलूमधून गंगेचे पाणी घेऊन आले. मी ते घेतले नाही. श्रद्धेला काही अर्थ आहे कि नाही ? एकही नदी स्वच्छ नाही. नदीला माता म्हणतो. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार, असे सांगितले जाते. गंगा अजून काही स्वच्छ झाली नाही. या श्रद्धा आणि अंधश्रद्धेतून बाहेर या.” (Prayagraj Kumbh mela 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community