islampur maharashtra : एक अनोखं शहर इस्लामपूर; हे शहर इतकं का आहे प्रसिद्ध?

23
islampur maharashtra : एक अनोखं शहर इस्लामपूर; हे शहर इतकं का आहे प्रसिद्ध?
इस्लामपूर शहराबद्दल माहिती

उरण इस्लामपूर हे महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामध्ये असलेलं एक मुख्य शहर आहे. उरण इस्लामपूर नगरपरिषदेची स्थापना दिनांक १६ नोव्हेंबर १८५३ साली झाली. २००१ सालच्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ५८,३३० होती. उरण-इस्लामपूर नगरपालिका ही “ब” वर्गाची नगरपालिका आहे. उरण-इस्लामपूर हे शहर साधारणपणे ४,०४२ हेक्टर एवढ्या क्षेत्रफळावर वसलेलं आहे.

या शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण २६ वॉर्ड आहेत. त्या २६ वॉर्डमधून २६ नगरसेवक निवडून येतात. तसंच या नगरपालिकेत तीन नामनिर्देशित सदस्यही आहेत. या शहराच्या पश्चिम सीमेपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पर्यंत साधारणपणे २.५ किलोमीटर एवढ्या अंतरावरून, पेठ-सांगली हा राज्यमार्ग क्रमांक १३८ हा या शहरातून जातो. (islampur maharashtra)

(हेही वाचा – Budget Session 2025 : सत्ताधाऱ्यांचे मिशन; ‘टार्गेट आदित्य’)

इस्लामपूर शहरात असलेल्या नागरी सुविधा

इस्लामपूर शहरातल्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. इस्लामपूर या शहरामध्ये ७ लाख लिटरची एक आणि ७.५ लाख लिटरच्या दोन अशा एकूण तीन पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांमध्ये ११ किलोमीटर एवढ्या अंतरावरून कृष्णा नदीतून दोन टप्प्यांमध्ये या तीनही टाक्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातो.

नरसिंगपूर हे इस्लामपूरपासून १० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. इस्लामपूर शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, केआरपी कन्या, मालती कन्या आणि आर अशी काही प्रसिद्ध महाविद्यालयं आहेत. यांमध्ये आयटी कॉलेजसारख्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचाही समावेश आहे. इस्लामपूर हे निमग्रामीण शहर आहे.

उरण हा या शहराचा मुख्य भाग आहे. उरण इथून या शहराचा खरोखरच विस्तार झाला आहे. म्हणूनच या शहराचं मूळ नाव उरण-इस्लामपूर असं आहे. या उरण परिसरामध्ये महादेवांचं एक मोठं मंदिर आहे. याव्यतिरिक्त इथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना आहे. त्या करखान्याजवळ एक एक मोठं राममंदिर आहे. तसंच या मंदिराजवळ राजारामबापू पाटील इंजिनिअरिंग कॉलेजही आहे. (islampur maharashtra)

(हेही वाचा – surmai fish : खमंग चमचमीत सुरमई घरच्या घरी बनवण्यासाठी सोपी रेसिपी!)

उरण-इस्लामपूर शहरात असलेली शासकीय कार्यालये

उरण- इस्लामपूर हे शहर वाळवा तालुक्यात येत असलं तरीही, तालुक्याची सगळी शासकीय कार्यालये उरण-इस्लामपूरमध्येच आहेत. यामध्ये तहसीलदार, प्रांत कार्यालय, पोलिस स्थानक, उपविभागीय पोलिस कार्यालय, फौजदारी आणि दिवाणी न्यायालये, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालये, भूमी अभिलेख कार्यालय, शहर सर्वेक्षण कार्यालय, मुद्रांक आणि दस्त नोंदणी कार्यालय इत्यादी प्रमुख कार्यालयांचा समावेश आहे. (islampur maharashtra)

(हेही वाचा – Local Body Elections : खासदार हवा, आमदार हवा, मग नगरसेवक का नको?)

उरण-इस्लामपूर शहराची शिक्षण व्यवस्था

उरण-इस्लामपूर या शहरामध्ये वेगवेगळ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रामुख्याने आदर्श बालक मंदिर, इस्लामपूर हायस्कूल, विद्या मंदिर, सद्गुरु विद्यालय, यशवंत हायस्कूल इत्यादी शाळा प्रमुख आहेत. तसंच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रकाश पब्लिक स्कूल, विद्यानिकेतन इत्यादींचा समावेश आहे.

उरण-इस्लामपूर इथे असलेलं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय हे सर्वांत जुनं महाविद्यालय आहे. या कॉलेजची स्थापना १९६१ साली करण्यात आली होती. ग्रामीण भागातलं एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून हे कॉलेज ओळखलं जात. या कॉलेजमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणही उपलब्ध आहे. इथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. त्यातून अनेक अधिकारी सरकारी पदांवर कार्यरत आहेत. (islampur maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.