visapur fort : विसापूर किल्ल्यामध्ये पोहोचायचं असेल तर जवळचं रेल्वे स्थानक कोणतं आहे?

22
visapur fort : विसापूर किल्ल्यामध्ये पोहोचायचं असेल तर जवळचं रेल्वे स्थानक कोणतं आहे?

विसापूर किल्ला (visapur fort) हा महाराष्ट्रातल्या विसापूर नावाच्या गावाजवळ वसलेला एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला लोहगड-विसापूर तटबंदीचा एक भाग आहे.

विसापूर किल्ल्याचं स्थान

हा किल्ला पुणे जिल्ह्यात स्थित आहे. मालवली रेल्वे स्थानकापासून ५ ते ६ किलोमीटर एवढ्या अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी ३ किलोमीटर एवढा उंच रस्ता आहे. विसापूर किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १,०८४ मीटर एवढी आहे. लोहगडच्या पठारावरच हा किल्ला (visapur fort) बांधलेला आहे.

(हेही वाचा – islampur maharashtra : एक अनोखं शहर इस्लामपूर; हे शहर इतकं का आहे प्रसिद्ध?)

विसापूर किल्ल्याचा इतिहास

हा किल्ला १७१३ ते १७२० सालादरम्यानचे मराठा साम्राज्याचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला होता. विसापूर किल्ला (visapur fort) लोहगड किल्ल्याच्या खूप नंतर बांधला गेला होता. पण दोन्ही किल्ल्यांच्या इतिहासात जवळचा संबंध आहे. लोहगडावरची सुरक्षा पाहण्यासाठी विसापूर किल्ला बांधण्यात आला होता. या किल्ल्याची रचना जवळजवळ लोहगडसारखीच होती. पण लोहगडपेक्षा तो उंच होता.

विसापूर किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये

वळणदार आकाराच्या विसापूरच्या किल्ल्यावरून (visapur fort) चालण्यासाठी दोन तास लागतात. किल्ल्याची तटबंदी उंच आहे आणि पश्चिमेकडच्या बुरुजांनी मजबूत केली आहे. इतर भागांमध्ये ३ फूट जाडीच्या तटबंदीपासून दगडी प्लॅटफॉर्मने बनवलेली आहे. तिथे डोंगरउतार सोपा आहे. दगडाच्या कमानापर्यंत ज्याठिकाणी पठार एका खोऱ्यात संपतं त्या ठिकाणी मध्यवर्ती प्रवेशद्वाराच्या बाजूला अजूनही दोन मोठे बुरुज आहेत.

(हेही वाचा – Local Body Elections : खासदार हवा, आमदार हवा, मग नगरसेवक का नको?)

विसापूर किल्ल्यावर कसं पोहोचायचं?

विसापूर किल्ल्यावर (visapur fort) पोहोचण्यासाठी सर्वांत स्वस्त आणि सोयीस्कर मार्ग म्हणजे रेल्वे होय. विसापूर किल्ल्यापासून सर्वांत जवळचं रेल्वे स्थानक ’माळवली’ हे आहे. हे स्थानक किल्ल्यापासून अंदाजे ५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. माळवली हे स्थानक मुंबई, लोणावळा आणि पुण्याशी लोकल ट्रेनने जोडलेले आहे. माळवली स्टेशनपासून विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी टॅक्सी आणि रिक्षा उपलब्ध आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.