Champions Trophy Final : भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धांमध्ये दबदबा; शेवटच्या ३ स्पर्धांमध्ये २३ विजय आणि १ पराभव

Champions Trophy Final : यात भारतीय संघाने दोन स्पर्धाही जिंकल्या आहेत.

36
Champions Trophy Final : भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धांमध्ये दबदबा; शेवटच्या ३ स्पर्धांमध्ये २३ विजय आणि १ पराभव
  • ऋजुता लुकतुके

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाची सल कदाचित यामुळे पूर्णपणे नाही जाणार. पण, २०२३ पासून भारतीय संघाने आयसीसीच्या टी-२० आणि एकदिवसीय स्पर्धांवर गाजवलेल्या हुकुमतीची एक आकडेवारी समोर आली आहे. तो विश्वचषक, त्यानंतर २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि आता २०२५ चा चॅम्पियन्स करंडक मिळून भारतीय संघाची आयसीसी चषकांतील कामगिरी आहे २३ विजय आणि अवघा एक पराभव. इतकं भारतीय संघाचं वर्चस्व या स्पर्धांमध्ये राहिलं आहे.

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही भारतीय संघाने सलग १० सामने जिंकत अंतिम फेरीत मजल मारली होती. पण, अंतिम फेरीत अहमदाबाद इथं ऑस्ट्रेलियन संघाने भारताच्या २४० धावांचा यशस्वी पाठलाग करत ६ गडी राखून हा सामना जिंकला आणि विजेतेपद भारताकडून हिसकावून घेतलं होतं. अंतिम फेरीत ट्रेव्हिस हेडच्या १३७ धावा भारतीय जखमांवर मीठ चोळणाऱ्या ठरल्या होत्या. ही स्पर्धा संपल्यावर भारताची विजयाची टक्केवारी होती १०-१. आयसीसी विजेतेपद हुकल्याची भावना तेव्हा खेळाडूंच्या मनात होती. (Champions Trophy Final)

पण, ही कसर भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेतेपदाने भरून काढली. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या स्पर्धेत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व गाजवत भारतीय संघाने अपराजित राहत ही स्पर्धा जिंकली होती. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या केन्सिंगटन ओव्हल मैदानात त्यांनी आफ्रिकन संघाचा ७ धावांनी पराभव केला.

(हेही वाचा – Local Body Elections : खासदार हवा, आमदार हवा, मग नगरसेवक का नको?)

भारतीय संघाचं हे दुसरं टी-२० विश्वचषक विजेतेपद होतं. आणि २००७ नंतर तब्बल तब्बल १७ वर्षांनी मिळवलेलं. त्यामुळे या विजयाचं मोल जास्त होतं. भारतीय संघाने सलग आठ सामने जिंकले. आणि एक अनिर्णित ठरला. म्हणजे पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत भारतीय विजयाची आकडेवारी १८-१ अशी सुदृढ राहिली. विराट, रोहीत आणि जाडेजा यांनी या विजयानंतर टी-२० प्रकाराला रामराम ठोकला. (Champions Trophy Final)

त्यानंतर आता २०२५ मध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक पुन्हा एकदा आपल्या नावावर केला आहे. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या या स्पर्धेत साखळी सामन्यांसह बाद फेरीतही निर्विवाद वर्चस्व राखत भारतीय संघाने आपले सर्व सामने जिंकले. इथं भारताची विजयाची आकडेवारी आहे ५-०

(हेही वाचा – Veer Savarkar : ऐतिहासिक शेतकरी मेळावे घेणारे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ)

थोडक्यात मागच्या दोन वर्षांतील भारताची कामगिरी आहे, २५ सामने, २३ विजय, १ अनिर्णित आणि १ पराभव ! भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-२० प्रकारात निर्विवाद प्रभुत्व गाजवलं आहे. (Champions Trophy Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.