Sugarcane Truck Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाचा ट्रक उलटून चौघे ठार, 13 जण जखमी

Sugarcane Truck Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाचा ट्रक उलटून चौघे ठार, 13 जण जखमी

42
Sugarcane Truck Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाचा ट्रक उलटून चौघे ठार, 13 जण जखमी
Sugarcane Truck Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाचा ट्रक उलटून चौघे ठार, 13 जण जखमी

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) कन्नड पिशोर रस्त्यावर उसाच्या ट्रकचा भीषण अपघात (Sugarcane Truck Accident) झाला आहे. या अपघातात (Accident News) उसाच्या ट्रक खाली 17 मजूर दबले असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी असल्याची माहिती आहे. रात्री 12 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. (Sugarcane Truck Accident)

हेही वाचा-महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प ; Ajit Pawar कोणत्या घोषणा करणार?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रकवर 17 मजूर बसून चालले होते. त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामूळे मजूर उसाखाली दबले. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि वर्दळ कमी असल्याने वेळीच मदत मिळू शकली नाही. उपस्थित लोकांनी या मजुरांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. त्यातील 13 मजुरांना वाचवण्यात यश आले. (Sugarcane Truck Accident)

हेही वाचा-Mahakumbh Blast Planning : हँड ग्रेनेड घेऊन महाकुंभाच्या प्रवेशद्वाराजवळ राहत होता दहशतवादी ; उच्च सुरक्षेमुळे अनर्थ टळला !

सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र ही घटना नेमकी कशी आणि कुणाच्या चुकीमुळे झाली याचा तपास पोलीस करत आहे. (Sugarcane Truck Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.