
-
ऋजुता लुकतुके
भारतीय खेळाडूंनी चॅम्पियन्स करंडक जिंकल्यावर खेळाडूंना चषक आणि पदकाबरोबरच एक पांढऱ्या शुभ्र रंगाचं जॅकेटही भेट मिळालं. चॅम्पियन खेळाडूंना हे जॅकेट देण्याची प्रथा २००९ मध्ये सर्वप्रथम सुरू झाली. तेव्हा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत विजेत्या संघातील खेळाडूंना पदकाबरोबरच असं जॅकेट देण्यात आलं होतं. स्पर्धेची स्वतंत्र ओळख राहावी अशी आयसीसीची इच्छा होती आणि त्यातून त्यांनी ही कल्पना राबवली. (Champions Trophy Final)
विजेत्या खेळाडूंना पांढऱ्या शुभ्र लोकरीचे जॅकेट्स भेट देण्यात येतात. यंदाचे जॅकेट्स मुंबईतील फॅशन डिझायनर बबिता एम यांनी बनवले होते. शुद्ध इटालियन लोकरीने बनलेल्या या जॅकेटला सोनेरी किनारही आहे आणि आयसीसीचा लोगो यावर कोरलेला आहे. या लोगोलाही सोनेरी किनार आहे. १३ ऑगस्ट २००९ ला अशी जॅकेट्स चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघातील खेळाडूंना पहिल्यांदा देण्यात आली. गोल्फमध्ये विजेत्या खेळाडूला हिरव्या रंगाचं जॅकेट देण्यात येतं, त्या धर्तीवर या उपक्रमाला सुरुवात झाली. (Champions Trophy Final)
माजी पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रमने स्पर्धेपूर्वी यंदाची सफेद जॅकेच लोकांसमोर पहिल्यांदा आणली होती. ‘या जॅकेटला परंपरा आहे आणि तंत्र कुशलतेचं प्रतीक म्हणून ही जर्सी ओळखली जाते. जागतिक स्तरावर सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूंनाच हे जॅकेट मिरवता येणार आहे,’ असं अक्रम तेव्हा म्हणाला होता. (Champions Trophy Final)
(हेही वाचा – Sugarcane Truck Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाचा ट्रक उलटून चौघे ठार, 13 जण जखमी)
Similar vibes across India’s two #ChampionsTrophy triumphs 🤩 pic.twitter.com/YpgLIzou5F
— ICC (@ICC) March 9, 2025
भारतीय संघाने यंदाच्या चॅम्पियन्स करंडकात सलग ५ सामने निर्विवादपणे जिंकत ही जॅकेट्स जिंंकली. ५ पैकी ४ सामने भारतीय संघाने दुसरी फलंदाजी करत जिंकले हे विशेष. अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने विजयासाठी २५१ धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. पण, रोहित शर्माच्या ७६, श्रेयस अय्यरच्या ४८ आणि शेवटी के. एल. राहुलच्या नाबाद ३४ धावांच्या जोरावर ४ गडी आणि ५ चेंडू राखून भारतीय संघाने विजय मिळवला. (Champions Trophy Final)
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा थोडाफार वचपा या विजयातून भारतीय संघाने काढला आहे. शिवाय मागच्या २ वर्षांत भारतीय संघाने जिंकलेला हा सलग दुसरा आयसीसी करंडक आहे. (Champions Trophy Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community