Champions Trophy Final : रोहित शर्माने निवृत्तीच्या चर्चेला दिला पूर्णविराम

Champions Trophy Final : चॅम्पियन्स करंडकानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितने या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं. 

59
Champions Trophy Final : रोहित शर्माने निवृत्तीच्या चर्चेला दिला पूर्णविराम
  • ऋजुता लुकतुके

‘आताच निवृत्त होण्याचा कुठलाही विचार नाही,’ असं स्पष्ट सांगत भारतीय कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स करंडकातील विजेतेपदानंतर निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. संघाच्या विजेतेपदानंतर ही अधिकृत परिषद होती. पत्रकारांनी कुठलाही प्रश्न विचारण्याआधीच रोहित गरजला, ‘आणखी एक गोष्ट तुमच्यासमोर स्पष्ट करायची आहे. मी या प्रकारातून निवृत्त होत नाहीए. त्यामुळे कोणीही अफवा पसरवू नयेत!’ (Champions Trophy Final)

अंतिम सामन्यात गरज असताना रोहित भारतासाठी मैदानात उभा राहिला. त्याच्या ७६ धावांमुळे भारतीय संघासाठी २५१ धावांचा पाठलाग सोपा झाला. या आधीच्या सामन्यांत चांगल्या सुरुवातीनंतर रोहित शर्मा २० किंवा ३० धावा करत बाद होत होता. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला मिळालेल्या विश्रांती दरम्यान, रोहितच्या निवृत्तीच्या चर्चा दुबईतही सुरूच होत्या. आणि या स्पर्धेनंतरच याची घोषणा होईल, असंही बोललं जात होतं. इतकंच नाही तर आयपीएलनंतर रोहित जूनमधील इंग़्लंडचा दौराही करणार नाही, असं बोललं जात होतं. पण, रोहितने ‘या प्रकारातून निवृत्त होणार नसल्याचं सांगत सध्या एकदिवसीय निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली आहे. (Champions Trophy Final)

(हेही वाचा – Champions Trophy Final : भारतीय संघाच्या विजयानंतर सुनील गावस्करांचं मैदानातच सेलिब्रेशन; नृत्य सोशल मीडियावर व्हायरल)

मोठी धावसंख्या रचल्यामुळे रोहित खुश असला तरी खेळायचा दृष्टीकोण बदललेला नव्हता, असं त्याने स्पष्ट केलं. ‘मी आघीच्या सामन्यात जे करत होतो, तेच केलं. पॉवर प्लेमध्ये हाणामारी करायची कारण, एकदा क्षेत्ररक्षक विखुरले की, फटकेबाजी कठीण होत जाते,’ असं रोहित म्हणाला. त्याच रणनीतीने त्याने न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी केली. शुभमनच्या मदतीने त्याने या स्पर्धेतील पहिली आणि एकमेव शतकी सलामी अंतिम सामन्यात दिली. त्यामुळेच भारतीय विजय सोपा झाला. (Champions Trophy Final)

वैयक्तिक खेळापेक्षा संघाचा विजय जास्त आनंद मिळवून देतो, असंही रोहित म्हणाला. ‘२०१९ मध्ये मी चांगलाच खेळलो होतो. पण संघाला उपांत्य फेरीच्या पुढे जाता आलं नाही. त्याचं दु:ख मोठं होतं. तसं यंदा झालं नाही. याचं समाधान वाटतं. वैयक्तिक कामगिरीपेक्षा खेळाडूला संघ जिंकला तर ते जास्त आनंददायी असतं,’ असं त्याने सांगितलं. चॅम्पियन्स करंडकानंतर भारतीय खेळाडू २२ मार्च पासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर जून महिन्यात भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्डंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. (Champions Trophy Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.