भारताच्या विजयाचा धर्मांधांना पोटशूळ; Madhya Pradesh मध्ये दुकाने आणि वाहने पेटवली, पेट्रोल बॉम्बही फेकले

133

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) महू येथे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) टीम इंडियाच्या विजयानंतर काढलेल्या मिरवणुकीदरम्यान वाद झाला. येथे मिरवणूक मशिदीसमोरून जातांना भारताच्या विजयाच्या घोषणा दिल्याने धर्मांधांनी दुकाने आणि वाहने पेटवली, पेट्रोल बॉम्बही फेकले.

(हेही वाचा – Champions Trophy Final : चॅम्पियन्स करंडक विजेतेपदासाठी भारतीय संघाला किती रक्कम मिळाली?)

रविवार, ९ मार्च रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भारताच्या विजयानंतर, १०० हून अधिक क्रिकेटप्रेमींनी ४० हून अधिक दुचाकीवरून मिरवणूक काढत होते. यामध्ये सहभागी असलेले लोक जय श्रीरामच्या घोषणा देत होते. दरम्यान, जामा मशिदीजवळ फटाके वाजवल्यावरून धर्मांधांनी आक्षेप घेतला आणि मिरवणुकीला विरोध सुरु झाला.

चार पोलीस ठाण्यांतील पोलीस पाचारण

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. गोंधळ वाढू लागल्याने, जवळच्या चार पोलीस ठाण्यांमधील पोलीस दलांना महू येथे पाचारण केले. ३०० हून अधिक सैन्य तैनात करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष सिंह आणि डीआयजी निमिश अग्रवाल पहाटे १.३० वाजता महू येथे पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी शहरात फेरफटका मारला. लष्कराच्या जवानांनीही जबाबदारी स्वीकारली. सुमारे अडीच तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणता आली. ८ लष्करी जवानांची तुकडी, क्विक रिस्पॉन्स टीम (Quick Response Team) (क्यूआरटी) देखील पाचारण करण्यात आली आहे.

१२ हून अधिक दुचाकी आणि दोन कार पेटवण्यात आल्या

पट्टी बाजार, मार्केट चौक, जामा मशीद, बटख मोहल्ला आणि धान मंडीबाहेर पार्क केलेल्या १२ हून अधिक दुचाकींना हल्लेखोरांनी आग लावली. दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि त्यांना आग लावण्यात आली. पट्टी बाजार परिसरात प्रेस क्लबचे अध्यक्ष राधे लाल यांच्या घराला आग लावण्यात आली. बटख मोहल्ला येथे एका दुकानाला आग लावण्यात आली. मार्केट चौकातील दोन दुकानांबाहेर आग लावण्यात आली. (Madhya Pradesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.