
-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला जायला नकार दिल्यावर स्पर्धेचं स्वरुप हायब्रीड करण्यात आलं. आणि स्पर्धा पाकिस्तानबरोबरच संयुक्त अरब अमिरातीत हलवण्यात आली. भारताचे सर्व सामने अगदी उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामनाही दुबईत झाला. पण, त्यामुळे अंतिम सामन्यात स्पर्धेचे संयुक्त यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रतिनिधी हजरच नव्हते. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. आयसीसीने पाक मंडळाला आमंत्रित केलं की नाही, यावरून चर्चा सुरू आहे. पाक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमेर अहमद हे स्पर्धा संचालकही होते आणि ते दुबईत उपस्थितही होते. पण, तरीही त्यांना बक्षीस वितरणासाठी व्यासपीठावर बोलावण्यात आलं नाही, अशीही चर्चा सुरू आहे. (Champions Trophy Final)
(हेही वाचा – Champions Trophy Final : चॅम्पियन्स करंडक विजेतेपदासाठी भारतीय संघाला किती रक्कम मिळाली?)
‘पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी हे देशाचे केंद्रीय मंत्रीही आहेत आणि त्यांना सरकारी काम असल्यामुळे दुबईला जाणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळे सीईओ सुमेर अहमद यांना पाठवण्यात आलं. पण, बक्षीस वितरणावेळी आयसीसीचा काहीतरी गोंधळ झाला आणि त्यांनी पाकिस्तान मंडळापैकी कुणालाही व्यासपीठावर बोलावलं नाही,’ असं या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Champions Trophy Final)
(हेही वाचा – Champions Trophy Final : रोहित शर्माने निवृत्तीच्या चर्चेला दिला पूर्णविराम)
व्यासपीठावर आयसीसीचे अध्यक्ष म्हणून जय शाह, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि इतर आयसीसी अधिकारी हजर होते. पाक क्रिकेट बोर्डाने आता मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे आणि आयोजक असतानाही व्यासपीठावर स्थान न मिळाल्याची तक्रार आयसीसीकडे करण्यात येणार आहे. पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावरही या गोष्टीला वाचा फोडली आहे. प्रत्यक्ष चर्चा सुरू होण्यापूर्वीच अख्तरने एक व्हिडिओ ट्विटरवर टाकला आणि यात भारताने चॅम्पियन्स करंडक जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच पाकचा अधिकारी व्यासपीठावर का नव्हता, असा सवालही विचारला आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी विजेता कर्णधार रोहित शर्माला करंडक आणि विजेत्या खेळाडूंना पदक बहाल केली. तर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी खेळाडूंना सफेद जॅकेट दिली. (Champions Trophy Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community