राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सातत्याने येत आहे. अशातच एयर इंडियाच्या मुंबई ते न्यूयॉर्क विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Air India Flight Security Threat) देण्यात आली होती. यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) उतरवण्यात आले, अशी माहिती मिळाली तर ३२० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आणि सुरक्षा एजन्सींकडून त्याची तपासणी केली जात आहे. (Air India)
(हेही वाचा – bird flu : केंद्र सरकारचा ९ राज्यांना अलर्ट ; चिकन खाणाऱ्यांनी आवर्जुन वाचा …)
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या शौचालयात बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb threat) असलेली चिठ्ठी आढळून आली. या विमानात १९ क्रू मेंबर्ससह ३२२ प्रवासी प्रवास करत होते. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमान मुंबई येथे सकाळी १०.२५ वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले. १० मार्चला मुंबई-न्यूयॉर्क (JFK) विमान प्रवासादरम्यान एआय११९ विमानात संभाव्य सुरक्षेचा धोका आढळून आला. यानंतर विमानातील प्रवाशांची सुरक्षा विचारात घेत आवश्यक प्रोटोकॉल नुसार विमान परत मुंबईला वळवण्यात आले, अशी माहिती एअर इंडियाच्या (Air India) निवेदनात देण्यात आली आहे.
(हेही वाचा – रोहित-कोहली नंतर CM Devendra Fadnavis यांच्याकडून ‘या’ खेळाडूच तोंडभरून कौतुक)
तसेच या घटनेनंतर विमानाच्या पुढील उड्डाणीची वेळ बदलण्यात आली आहे, ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजता हे विमान पुन्हा उड्डाण करेल. तोपर्यंत सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, जेवण आणि इतर मदत देण्यात आली आहे, असे एअरलाइनने (airline) सांगितले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community