दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे पादचारी पुलाशेजारी असलेल्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. हे मंदिर बेकायदेशीर आहे, त्यामुळे ते हटवण्याची गरज आहे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वेने यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या काळात या मंदिराची जागा रेल्वेकडे सुपूर्द करण्यात यावी, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
काय म्हटले आहे रेल्वेच्या नोटिशीत?
- रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर हनुमान मंदिर हे रेल्वेच्या जागेवर बेकायदेशीर बांधण्यात आले आहे असल्याचे दिसून आले आहे.
- या मंदिरामुळे प्रवाशांच्या वर्दळीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.
- तसेच रेल्वे स्थानकाशेजारी विकासकामे करण्यासाठी मंदिरामुळे अडथळे येत आहेत.
- रेल्वेने याआधीही हे मंदिर बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मंदिर तात्काळ तोडण्याविषयी सांगितले होते.
- आता ही नोटीस मिळाल्यानंतर पुढील ७ दिवसांत या मंदिराची जागा रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावी.
- अन्यथा रेल्वे प्रशासन बळाचा वापर करून मंदिर हटवेल.
(हेही वाचा: मलिकांच्या तोंडीही आता ‘नानां’ची भाषा!)
शिवसेनेचा विरोध!
रेल्वे प्रशासनाने या मंदिराला दिलेल्या नोटिशीचा शिवसेनेने विरोध केला आहे. यासाठी शिवसेनेने आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी पेटणार आहे, अशी शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community