गेल्या काही वर्षापासून वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील प्रत्येक सरकार सातत्याने जनतेच्या रोषाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच राज्यातील विद्यमान महायुतीच्या (Maha Yuti) सरकारने निवडणुकीच्या आधी प्रचारकाळात वीज दर कमी करण्याबाबत घोषणा केली होती. दरम्यान दि. १० मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होतील, अशी घोषणा केली आहे.
( हेही वाचा: IPL 2025 : आयपीएल २०२५ मधून हॅरी ब्रूकची माघार)
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, महावितरण कंपनीने (Mahavitaran Company) पुढील पाच वर्षांसाठी दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (Maharashtra Electricity Regulatory Commission) सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जाच्या (Sustainable energy) खरेदीमुळे येत्या पाच वर्षांमध्ये राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील, असे पवार (Ajit Pawar) म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community