Budget Session 2025: भारतीय संघाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर विधान परिषदेत राजकीय टोलेबाजी

51
मुंबई प्रतिनिधी:
Budget Session 2025 : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकल्याने आज विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मात्र, भारतीय संघाच्या विजयाचा उत्सव साजरा करताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोलेबाजी रंगली, त्यामुळे संपूर्ण सभागृहात हशा पिकला. (Budget Session 2025)
१२ वर्षांनी मिळालेले यश आणि राजकीय टोले
दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ४ विकेट्सनी विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना त्यांनी, “हा प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा सोनेरी क्षण आहे. तब्बल १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला हे यश मिळाले. संघ म्हणून एकत्र येऊन काम केले, तर दैदीप्यमान यश मिळते. आम्हीही विधानसभा निवडणुकीत असेच संघ म्हणून काम केले आणि निर्णायक विजय मिळवला,” असे म्हणत विरोधकांना डिवचले.

(हेही वाचा – वाढवण बंदराला तिन्ही मार्गाने जोडणार ; विधानसभेत Ajit Pawar यांची घोषणा)

विरोधी पक्षांचा जोरदार प्रत्युत्तरवार
यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला चिमटे काढत प्रत्युत्तर दिले. म्हणाले, “भारतीय संघाने ज्या पद्धतीने खेळ केला, तो अभिमानास्पद आहे. त्यांनी कोणतेही फेरफार, पैसे वाटप किंवा ईव्हीएम मॅनेज न करता सर्व सामने जिंकले!” असा जोरदार टोला त्यांनी लगावला. तसेच, “संघातील सर्व खेळाडूंना विधानभवनात बोलावून त्यांचा सत्कार करा. राज्याची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर प्रत्येकी ₹१ कोटी बक्षीस जाहीर करा,” अशी मागणीही त्यांनी केली.
कॉंग्रेस आमदार भाई जगताप यांचाही टोला
कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप (Congress MLA Bhai Jagtap) यांनीही या चर्चेत उडी घेतली आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रत्येक सामन्यात नाणेफेक हरली तरीही संघाने विजय मिळवला, हे लक्षात घेत, “नाणेफेक हरली म्हणून त्यांनी हिंमत सोडली नाही,” असा चिमटा महायुतीला काढला. त्यावर प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांनी, “नाणेफेकीवर प्रश्न विचारण्यापेक्षा चांगला खेळ करण्यावर भर दिला. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे,” असा प्रतिटोला लगावला.

(हेही वाचा – Maharashtra Budget 2025: जाणून घ्या राज्याच्या अर्थसंकल्पातील १० प्रमुख घोषणा )

सभागृहात जोरदार हशा आणि चर्चा
भारतीय संघाच्या विजयाचे कौतुक करताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके उडाले. सत्ताधारी आणि विरोधकांमधील ही शाब्दिक चकमक सभागृहात रंगतदार झाली आणि उपस्थित सदस्यांसाठी एक करमणुकीचा क्षण ठरला.

भारतीय संघाच्या सन्मानासाठी पुढील पावले?
सभागृहात यावेळी भारतीय संघाच्या सत्कारासाठी विशेष कार्यक्रम घ्यावा, त्यांना रोख बक्षीस द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर सरकार कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.