लेवाशक्ती महिला महामंचच्या वतीने महिला दिनानिमित्त वाल्हेकरवाडी – रावेत – निगडी प्राधिकरण परिसरातून भव्य दुचाकी रॅली काढून महिला दिन (World Women Day) साजरा करण्यात आला. या फेरीची सुरुवात वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी मंदिरा समोरून महिलांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अनुजा फालक, कविता कोल्हे, कांचन ढाके, डॉ. हर्षाली नेमाडे, महामंचाच्या अध्यक्षा रेखा भोळे आदी उपस्थित होते. लेवा महिलांचे एकत्रिकरण हा उद्देश, महिला एकत्रित आल्या तर कुटुंबाचा, समाजाचा देशाचा विकास नक्कीच करू शकतील, यामध्ये सर्व लेवा भगिनींचे मोलाचे सहकार्य आहे, या फेरीत गुलाबी फेटे बांधून, हातात विविध संदेश देणारे फलक घेवून सुमारे ३०० महिला सहभागी झाल्या होत्या.
(हेही वाचा Anand Safar च्या माध्यमातून संस्कृतीची होणार देवाण घेवाण)
चिंतामणी मंदिर या ठिकाणी या रॅलीला प्रारंभ झाला. वाल्हेकरवाडी- राज कॉलनी- भोंडवे कॉर्नर- डिवाय पाटील कॉलेज रोड-आकुर्डी रेल्वे स्टेशन-प्राधिकरण या मार्गे निघाली. (World Women Day) निगडीतील ज्ञानेश्वर गार्डन या ठिकाणी या रॅलीची समाप्ती करण्यात आली.यावेळी सहभागी महिलांना भेटेवस्तू व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजेच जळगाव, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, मलकापूर, बुलढाणा, नांदेड गाव तालुका धरणगाव अशा बऱ्याच शहरांमध्ये पण लेवाशक्ती महिला महामंचची रॅली काढण्यात आली. रॅलीच्या आयोजनासाठी गौरी सरोदे, चारूलता चौधरी,किरण पाचपांडे शितल नारखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीता बोरोले,पल्लवी वायकोळे, शारदा परतणे, रुपाली गाजरे, शीतल नारखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Join Our WhatsApp Community