सध्या हिंदूंना सहजासहजी झटका पद्धतीचे मांस मिळत नाही, त्यामुळे हिंदूंची गैरसोय होत असते. झटका पद्धतीचे मांस देणाऱ्या खाटीक समाजाची दुकानेही बहुतांश हिंदूंना माहित नसतात. या सर्व समस्येचे निराकारण करणारी उपाययोजना करण्यात आली आहे. हिंदू समाजातील खाटीकांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन’ योजना सुरू केल्याची घोषणा मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले आवाहन यांनी केली आहे.
आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस
आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम(https://t.co/fQAwGvAdca) या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व १००… pic.twitter.com/u0zdi2rjBt
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 10, 2025
या योजनेअंतर्गत फक्त हिंदू खाटीकांना हे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम (http://MalharCertification.com) या पोर्टलच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र वितरित केले जाईल. याविषयीची माहिती मंत्री राणे यांनी ‘एक्स’वर दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हिंदू समाजासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मल्हार सर्टिफिकेशन मिळालेल्या दुकानांमध्येच 100% हिंदू व्यापारी व खाटीक असतील, तसेच येथे विकले जाणारे मांस शुद्ध आणि भेसळमुक्त असेल. त्यामुळे लोकांनी अशाच दुकानांमधून मटण खरेदी करावे आणि जिथे हे सर्टिफिकेशन नसेल, तिथून खरेदी टाळावी, असे आवाहन मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी केले आहे.
(हेही वाचा Prayagraj Kumbh mela 2025 : महाकुंभादरम्यान गंगेचे पाणी स्नानास योग्यच होते; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल)
हिंदू समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी नवा उपक्रम मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले की, या योजनेच्या माध्यमातून हिंदू समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळेल. मल्हार सर्टिफिकेशनच्या मदतीने हिंदू खाटीकांना अधिकृत मान्यता आणि व्यवसायात प्रोत्साहन मिळेल. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असा आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित, असेही मंत्री राणे (Nitesh Rane) म्हणाले.
मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण म्हणजे काय?
‘मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण’ हे एक नवीन प्रमाणपत्र असेल, जे १००% हिंदू समाजाच्या नियंत्रणाखालील मटण दुकानांना दिले जाईल. या सर्टिफिकेशनच्या माध्यमातून
- मटणाच्या शुद्धतेची खात्री केली जाईल.
- मटणामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसेल याची हमी दिली जाईल.
- फक्त प्रमाणित दुकानदारांनाच विक्रीचा परवाना मिळेल.
मटणाच्या गुणवत्तेशी संबंधित काही तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे हिंदू समाजाच्या हितासाठी आणि मटणातील भेसळ रोखण्यासाठी ‘मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण’ पद्धती राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community