मुंबई ही क्रिकेटची पंढरी असं मानलं जातं. या मुंबईमध्ये आयपीएल क्रिकेटचे सामने (IPL Cricket tournaments)
ही खेळवण्यासाठी राज्य शासन (state) काही प्रमाणात करा सवलत देते, त्याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (business tourism)
( हेही वाचा : Maharashtra Budget 2025 च्या अर्थसंकल्पात कोणत्या विभागासाठी किती तरतूद? वाचा सविस्तर)
मुंबईमध्ये आयपीएल सामने होतात त्यासाठी राज्य (state) सरकारकडून आयपीएलसाठी कर सवलत का देते? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपण त्यांना कर सवलत देतो त्याच्या प्रमाणात आपल्याकडे व्यवसाय निर्मिती होते त्याचे प्रमाण पाहिले तर कर सवलत देतो त्यापेक्षा अधिक उत्पन्न आपल्याला मिळते.
आयपीएलमुळे आपल्याकडे पर्यटक येणार असतील, होटल व्यवसाय वाढणार असेल तर जीएसटीच्या रूपात कर सवलतीच्या तिप्पट पैसे येणार असतील तर राज्याच्या हिताचे आहे, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले आपण कर सवलत नाही दिली तर ते दुसरीकडे सामना भरवतील. तात्विकदृष्ट्या मलाही आयपीएलला (IPL Cricket tournaments) कर सवलत (taxes) देणे पटत नसले तरी आपल्याला अर्थकारणही बघावे लागते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community