काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्याविरुद्ध सोमवारी कर्नाटकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या एनजीओ फाउंडेशन फॉर रिव्हायटायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडिशन्सवर वन विभागाच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप आहे.
भाजपाच्या तक्रारीवरून, पित्रोदा (Sam Pitroda) त्यांच्या स्वयंसेवी संस्थेतील एक सहकारी, वन विभागाचे चार अधिकारी आणि एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेते आणि अँटी बंगळुरू करप्शन फोरमचे अध्यक्ष रमेश एनआर यांनी २४ फेब्रुवारी रोजी ईडी आणि लोकायुक्तांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. १४ वर्षांपूर्वी भाडेपट्टा संपला, पण ताबा सोडला गेला नाही. सॅम पित्रोदा यांनी १९९६ मध्ये मुंबईत ही संस्था नोंदणीकृत केली. २००१ मध्ये हा भाडेपट्टा आणखी १० वर्षांसाठी वाढविण्यात आला. २०११ मध्ये भाडेपट्टा संपला होता, तरीही ते अजूनही जमिनीवर कब्जा करत आहेत. पित्रोदा (Sam Pitroda) आणि त्यांचे सहकारी या जमिनीवर आयुर्वेद रुग्णालय चालवत आहेत. याशिवाय वन विभागाच्या या जमिनीवर परवानगीशिवाय इमारतही बांधण्यात आली आहे.
या जमिनीची किंमत १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एफआयआरमध्ये एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचेही नाव आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात सॅम पात्रोदा (Sam Pitroda) , त्यांचे एनजीओ एफआरएलएचटी भागीदार दर्शन शंकर, वन आणि पर्यावरण विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर (निवृत्त आयएएस), प्रधान मुख्य वनसंरक्षक आरके सिंग, संजय मोहन, बंगळुरू शहरी विभागाचे उप वनसंरक्षक एन रवींद्र कुमार आणि एसएस रविशंकर यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community