Haribhau Bagade: ‘बलात्काऱ्यांना नपुंसक करा, छत्रपती शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते’; काय म्हणाले राजस्थानचे राज्यपाल?

208

Haribhau Bagade : महिलांवरील बलात्कार (Rape Case Punishment) आणि छेडछाडीच्या वाढत्या घटनांवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Rajasthan Governor Haribhau Bagde) यांनी मोठी टिप्पणी केली आहे. तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यपाल म्हणाले की, महिलांना त्रास देणाऱ्यांना मारहाण करावी आणि बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक (Impotent) करून सोडले पाहिजे, तरच असे गुन्हे कमी होतील. बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी सोहळ्यात (Bharatpur District Bar Association oath taking ceremony) राज्यपालांनी सोमवारी व्यासपीठावरून हे भाषण केले. (Haribhau Bagade)

(हेही वाचा – ‘X’ दोन वेळा झाले डाऊन; सायबर हल्ला झाल्याची Elon Musk यांची माहिती)

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, “जेव्हा शिवाजी महाराज महाराष्ट्रात राज्य करत होते, गावचा प्रमुख असणाऱ्या पाटलाने बलात्कार केला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक आदेश जारी केला. ते म्हणाले – बलात्कार करणाऱ्याला मारू नका, त्याचे हातपाय तोडून टाका. तो मरेपर्यंत तसाच राहिला. पाहिजे.” 

राज्यपाल म्हणाले की, महिलांवर अत्याचार होतात तेव्हा लोक व्हिडिओ बनवतात. हे बरोबर नाही. जर कोणत्याही महिलेचा विनयभंग झाला तर त्या पुरूषाला पकडा. तो माणूस आहे, तूही माणूस आहेस आणि तुझ्यासोबत २ ते ४ लोक येतील. जोपर्यंत आपल्या मनात ही मानसिकता येत नाही की आपण घटनास्थळी जाऊन विनयभंग करणाऱ्याला, बलात्कार करणाऱ्याला थांबवावे आणि त्याला मारहाण करावी, तोपर्यंत हे गुन्हे थांबणार नाहीत.

(हेही वाचा – Thane Municipal Corporation देणार विनामूल्य शाडू माती; मूर्ती घडविण्यासाठी जागा)

राज्यपाल बागडे म्हणाले की, गुन्हेगारांना कायद्याची भीती आहे की नाही हे माहित नाही. पण जर कोणी १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा विनयभंग केला, बलात्कार केला किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual assault) केला तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. तरीही असे गुन्हे थांबत नाहीत आणि असे प्रकार दररोज ऐकायला मिळतात. यावरून असे दिसून येते की गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती बाळगणे म्हणजे काय असते याची तुम्ही कल्पना करू शकता का? कायदे अस्तित्वात असूनही अशा घटना का घडतात, याबद्दल तुम्ही सूचना देऊ शकता? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असेही हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.