UPI आणि RuPay कार्डवर व्यापारी शुल्क लागू करण्याचा सरकारचा विचार; काय होतील परिणाम ?

UPI आणि RuPay कार्डवर सध्या MDR हे शुल्क शासनाने माफ केले असले, तरी आता पुन्हा ते लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.

73

देशात सध्या डिजिटल पेमेंटवर (Digital Payments) भर देण्याचे आवाहन केले जात आहे. आज मोबाईल रिचार्जपासून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार यूपीआयद्वारे केले जात आहेत. ऑनलाईन पेमेंट हेच व्यापाराचे मुख्य साधन होईल, अशी स्थिती येण्यास आता वेळ लागणार नाही. सध्या या व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क (MDR) लागत नाही. लवकरच ऑनलाईन पेमेंटवर शुल्क लागू करण्याची तयारी सरकार करत आहे. एमडीआर म्हणजेच व्यापारी सवलत दर हे एक प्रकारचे शुल्क आहे. जे दुकानदार त्यांच्या बँकांना डिजिटल पेमेंट प्रक्रियेसाठी देतात. सध्या हे शुल्क शासनाने माफ केले असले, तरी आता पुन्हा ते लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.

(हेही वाचा – Haribhau Bagade: ‘बलात्काऱ्यांना नपुंसक करा, छत्रपती शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते’; काय म्हणाले राजस्थानचे राज्यपाल?)

‘या’ दुकानदारांना शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव

बँकिंग उद्योगाकडून सरकारला एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ज्या दुकानदारांची वार्षिक उलाढाल ४० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना MDR (Merchant Discount Rate, मर्चंट डिस्काउंट रेट) लागू करावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे. सरकार या प्रस्तावावर विचार करत आहे. ज्या लहान दुकानदारांची वार्षिक विक्री ४० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना कोणताही MDR आकारला जाणार नाही, असे सध्याच्या प्रस्तावावरून दिसून येत आहे. सरकार जीएसटी स्लॅबसारखी प्रणाली लागू करू शकते. म्हणजे मोठ्या व्यापाऱ्यांकडून जास्त शुल्क आकारले जाईल आणि छोटे व्यापारी कमी किंवा शून्य शुल्क भरतील. याचा कोणत्याही प्रकारे छोट्या व्यावसायिकांवर परिणाम होणार नाही. परंतु, दरमहा लाखो कोटींचे डिजिटल पेमेंट करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांना शुल्क भरावे लागणार आहे, असे प्रस्तावावरून दिसून येते.

जेव्हा मोठे व्यापारी आधीच व्हिसा, मास्टरकार्ड (MasterCard) आणि क्रेडिट कार्डवर एमडीआर भरत आहेत, तर यूपीआय आणि रुपेवर का नाही? बँकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सरकारने २०२२ च्या अर्थसंकल्पात MDR रद्द केला, तेव्हा हे पाऊल उचलण्याचा उद्देश डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याचा होता. पण आता UPI हा सर्वात जास्त वापरला जाणारा पेमेंट पर्याय बनला आहे. त्यामुळे या सुविधेचा खर्च उचलण्याऐवजी सरकार बड्या व्यापाऱ्यांकडून शुल्क वसूल करू शकते, असे बँका आणि पेमेंट कंपन्यांचे म्हणणे आहे.

काय आहे MDR ?

एमडीआर म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट. MDR हे शुल्क दुकानदार आपल्या बँकेला डिजिटल पेमेंट प्रक्रिया करण्यासाठी देतात. जेव्हा एखादा ग्राहक UPI किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करतो, तेव्हा बँका आणि पेमेंट कंपन्यांना पायाभूत सुविधांचा खर्च उचलावा लागतो. या खर्चाची भरपाई करण्यासाठी हे शुल्क आकारले जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.