- ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy 2025) चॅम्पियन ठरलेल्या भारतीय संघाने आयसीसीच्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघावर आपला ठसा उमटवला आहे. विराट कोहलीबरोबरच (Virat Kohli) आणखी पाच भारतीय खेळाडूंनी या संघात स्थान मिळवलं आहे. आयसीसीने सोमवारी आपला बारा जणांचा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. रविवारी, न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करत भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) जिंकला आहे. यापूर्वी २००२, २०१३ साली भारताने हा करंडक जिंकला होता. तर २००० आणि २०१७ मध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता.
ज्या खेळाडूंनी आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या संघात स्थान मिळवलं आहे ते खेळाडू आहेत – विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल. यातील अक्षर पटेल हा संघातील बारावा खेळाडू आहे. या संघात उपविजेत्या न्यूझीलंडचे चार खेळाडू आहेत. या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेला रचिल रवींद्र (Rachin Ravindra), मिचेल सँटनर (Mitchell Santner) आणि ग्लेन फिलीप्स (Glenn Phillips) या संघात आहेत.
A star-studded ensemble ✨
Here are the standout performers who made it to the #ChampionsTrophy 2025 Team of the Tournament 🤩
Read more ➡️ https://t.co/83j5aSeDyA pic.twitter.com/RBBz1WHWJg
— ICC (@ICC) March 10, 2025
(हेही वाचा – Haribhau Bagade: ‘बलात्काऱ्यांना नपुंसक करा, छत्रपती शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते’; काय म्हणाले राजस्थानचे राज्यपाल?)
रचिन रवींद्रबरोबर (Rachin Ravindra) सलामीचा साथीदार आहे अफगाणिस्तानचा इब्राहिम झरदान. रवींद्रने (Rachin Ravindra) या स्पर्घेत दोन शतकांसह सर्वाधिक २६३ धावा ठोकल्या होत्या. आधी बांगलादेश आणि उपान्त्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने शानदार शतकं झळकावली. तर २३ वर्षीय झरदान आयसीसीच्या संघात स्थान मिळवणारा पहिला अफगाण खेळाडू ठरला आहे. त्याने साखलीत इंग्लंडविरुद्ध १७७ धावांची दमदार खेळी साकारली होती. तिसऱ्या क्रमांकावर ५८ धावांच्या सरासरीने स्पर्धेत २१८ धावा करणारा विराट कोहली (Virat Kohli) आहे. त्याने स्पर्धेत एक शतक तर एक अर्धशतक ठोकलं होतं. त्याच्या खालोखाल चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरने कब्जा केला आहे. श्रेयसने भारताकडून सर्वाधिक २४३ धावा या स्पर्धेत केल्या. तर पाचव्या क्रमांकावर के एल राहुलने स्थान मिळवलं आहे. तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात असेल. त्याने समयोचित यष्टीरक्षणाबरोबर मोलाच्या १४० धावा केल्या होत्या.
(हेही वाचा – BMC ने केली दोन विकासकांच्या मालमत्तेच्या जप्तीची कार्यवाही, तब्बल २१ कोटींची थकबाकी)
सहाव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा ग्लेन फिलीप्स आहे. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीतही चमक दाखवली. शिवाय स्पर्धेत तब्बल पाच अवघड झेल टिपले. यानंतर संघात मिचेल सँटनर, अहमदुल्ला ओमारझाई, मोहम्मद शमी आणि मॅट हेन्री यांचा समावेश आहे. तर बारावा खेळाडू म्हणून अक्षर पटेलची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे या संघात एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू नाही.
आयसीसी सर्वोत्तम खेळाडूंचा संघ (चॅम्पियन्स करंडक २०२५) – मिचेल सँटनर (कर्णधार), रचिल रवींद्र, इब्राहिम झरदान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, ग्लेन फिलीप्स, मिचेल सँटनर, अहमदुल्ला ओमारझाई, मोहम्मद शमी, मॅट हेन्री व अक्षर पटेल
हेही पहा –
Join Our WhatsApp Community