पश्चिम बंगालच्या (Bengal) कोलकाता (Kolkata) येथील जाधवपूर विद्यापिठात (Jadavpur University) देशविरोधी आणि आक्षेपार्ह भित्तीचित्रे आढळून आली आहेत. विद्यापिठाच्या भिंतीवर आझाद काश्मीर (Azad Kashmir) आणि स्वतंत्र पॅलेस्टाईनचे चित्र (Free Palestine, ग्राफिटी) बनवण्यात आले. १० मार्च रोजी परीक्षा सुरु असताना ही भित्तीचित्रे बनवण्यात आली होती. या प्रकरणात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विद्यापिठाच्या गेट क्रमांक तीनजवळील भिंतीवर हे चित्र काढण्यात आले आहे.
(हेही वाचा – UPI आणि RuPay कार्डवर व्यापारी शुल्क लागू करण्याचा सरकारचा विचार; काय होतील परिणाम ?)
शिक्षण मंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेत Jadavpur University चे विद्यार्थी जखमी
याबाबत माहिती मिळताच पोलीस साध्या वेशात कॅम्पसमध्ये पोहोचले. जाधवपूर विद्यापिठात (Jadavpur University) गेल्या काही दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत, याठिकाणी 1 मार्च रोजी राज्याचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांची कार आणि ते जात असलेल्या अन्य एका वाहनाची त्यांच्या वाहनाला धडक झाल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले होते. तेव्हापासून विद्यापिठात हिंसक निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणी बसू आणि ओम प्रकाश मिश्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
Jadavpur University च्या गेट ३ जवळ देशविरोधी संदेश
विद्यापिठाच्या गेट क्रमांक 3 जवळील भिंतीवर सोमवारी ‘आझाद काश्मीर’ आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ लिहिलेले दिसले, परंतु यामागे कोण किंवा कोणती संघटना आहे हे कळू शकले नाही. १ मार्चच्या घटनेनंतर ओमप्रकाश मिश्रा कॅम्पसमध्ये पोहोचले, तेव्हा ‘आम्हाला भाजप-टीएमसीच्या हुकूमशाहीपासून स्वातंत्र्य हवे आहे’, अशा घोषणा डाव्या संघटनांशी संबंधित विद्यार्थ्यांनी दिल्या. (Jadavpur University)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community