
सयाजीराव गायकवाड तिसरे (Sayajirao Gaekwad) हे १८७५ ते १९३९ सालापर्यंत बडोदा राज्याचे महाराज होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या राज्यात बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या होत्या. सयाजीराव गायकवाड (Sayajirao Gaekwad) हे गुजरातच्या काही भागांवर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या गायकवाड नावाच्या राजेशाही घराण्यातले सदस्य होते.
सयाजीराव तिसरे (Sayajirao Gaekwad) यांचा जन्म ११ मार्च १८६३ साली नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात कावळाणा नावाच्या गावात एका मराठा कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव गोपाळराव गायकवाड (Gopalrao Gaekwad) असं होतं.
(हेही वाचा – Champions Return : चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघासाठी यंदा बसमधून मिरवणूक का नाही?)
सयाजीराव गायकवाड तिसरे यांचं शासन आणि आधुनिकीकरण
राज्यकारभाराची सूत्रं हाती घेतल्यानंतर सयाजीराव यांनी आपल्या काही सुरुवातीच्या कामांमध्ये त्यांच्या प्रजेचं शिक्षण, मागासवर्गीयांचं उत्थान, न्यायालयीन कामं, कृषी आणि सामाजिक सुधारणा केल्या होत्या.
त्यांनी बडोद्याच्या वस्त्रोद्योगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांमध्ये बालविवाहावर बंदी, घटस्फोटाचे कायदे, अस्पृश्यता निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार, संस्कृतचा विकास, वैचारिक अभ्यास आणि धार्मिक शिक्षण तसेच ललित कलांना प्रोत्साहन या सर्व कामांचा समावेश होता.
सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी आपल्या आर्थिक विकासाच्या उपक्रमांमध्ये रेल्वेची स्थापना केली आणि १९०८ साली बँक ऑफ बडोदाचीही स्थापना केली. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ही अजूनही अस्तित्वात आहे. एवढंच नाही तर ती भारतामधल्या आघाडीच्या बँकांपैकी एक आहे.
(हेही वाचा – Demonization : कोल्हापूरच्या ‘या’ रहिवाशांना बंद झालेल्या ५०० आणि १००० च्या नोटा बदलून मिळणार; काय आहे प्रकरण ?)
सयाजीराव गायकवाड तिसरे यांना ते गुजरात राज्याचे मराठा शासक असल्याची पूर्णपणे जाणीव होती. त्यांनी लोकांना स्वतःची ओळख करून दिली. त्याबरोबरच त्यांनी आपल्या वैश्विक वृत्तीला आणि प्रगतीशील, सुधारणावादी धोरणाला आकार दिला. त्यांचं समृद्ध ग्रंथालय हे आजच्या बडोद्याच्या मध्यवर्ती ग्रंथालयांचं केंद्रक बनलं. या ग्रंथालयामध्ये त्यांच्या राज्यातल्या सर्व शहरं आणि गावांमध्ये ग्रंथालयांचं एक जाळं होतं.
१९०६ साली सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी आपल्या राज्यामध्ये सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केलं. तसं करणारे ते पहिले भारतीय शासक होते. त्यामुळे त्यांचा प्रदेश समकालीन ब्रिटिश भारतापेक्षा खूप पुढे गेला होता.
सयाजीराव गायकवाड तिसरे (Sayajirao Gaekwad) यांच्या दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्याचं स्मरण करण्यासाठी बडोदा मॅनेजमेंट असोसिएशनने २०१३ साली त्यांच्या नावाचा सयाजी रत्न पुरस्कार सुरू केला आहे.
(हेही वाचा – Chicken Biryani खाताना घशात अडकले कोंबडीचे हाड; उपचारासाठी मोजावे लागले ४ लाख)
सयाजीराव गायकवाड तिसरे यांचा वारसा आणि दृष्टिकोन
सयाजीराव गायकवाड तिसरे (Sayajirao Gaekwad) यांनी त्यांचे हक्क आणि दर्जा जपला होता. यामुळे त्यांचे ब्रिटिश सरकारशी अनेकदा वाद झाले होते. सयाजीरावांचे ब्रिटिशांबरोबर तत्त्व आणि प्रशासनाच्या बाबींवर अनेकदा संघर्ष होत असत. त्यांचे इतर ब्रिटिशांशी तसेच व्हाईसरॉय आणि भारत सरकारमधल्या अधिकाऱ्यांशी सतत आणि दीर्घकालीन तोंडी किंवा लेखी वाद होत असत.
सयाजीराव गायकवाड तिसरे (Sayajirao Gaekwad) यांना २९ डिसेंबर १८७६ साली फर्जंद-ए-खास-ए-दौलत-ए-इंग्लिशिया ही पदवी देण्यात आली होती. त्यांनी १८७७, १९०३ आणि १९११ सालच्या दिल्ली दरबारांना हजेरी लावली होती.
अर्जन कोळी आणि हरी कोळी हे धारी शहरातले दोन कोळी भाऊ होते. त्यांनी १९३३ साली शिकारीदरम्यान बडोदा राज्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे (Sayajirao Gaekwad) यांचे प्राण सिंहापासून वाचवले होते. त्यानंतर या दोन्ही भावांना बडोद्याच्या दरबारात सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्या कांस्य पुतळ्यांची स्थापना सयाजीराव गायकवाड (Sayajirao Gaekwad) यांनी शाही सयाजी बागेत केली.
सयाजीराव गायकवाड तिसरे (Sayajirao Gaekwad) यांना ६ फेब्रुवारी १९३९ साली वयाच्या ७६ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांचे नातू आणि वारस प्रतापसिंह राव गायकवाड हे बडोद्याचे पुढचे महाराजा झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community