-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चॅम्पियन्स करंडक विजेतेपदानंतर मायदेशी परतला आहे. आणि आल्या आल्या त्याने आपल्या एकदिवसीय निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम दिली आहे. ‘अनावश्यक अफवा नकोत,’ असं त्याने पत्रकारांना खडसावलं. फक्त जाडेजाच नाही तर रोहित आणि विराटच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचीही अफवा होती. पण, दोघांनी दुबईतच ही फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. जाडेजा (Ravindra Jadeja) मात्र सामना संपल्यानंतर बराच वेळ ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहली (Virat Kohli) शेजारी बसला होता. भारतीय संघ जिंकल्यावर या दोघांनीच एकमेकांना पहिली मिठी मारली. (Champions Return)
बरोबर अशीच घटना रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) निवृत्त होताना पर्थमध्ये घडली होती. अश्विनने निवृत्ती जाहीर करण्याच्या एक दिवस आधी तो पूर्णवेळ विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) होता. आणि दोघं काहीतरी गहन चर्चा करतानाही दिसले. त्यामुळे आताही सोशल मीडियावर रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) निवृत्तीची खास चर्चा सुरू झाली होती. जाडेजाने आता इन्स्टाग्रामवर एका ओळीचा संदेश लिहून ही फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Champions Return)
(हेही वाचा – PM Narendra Modi यांचे मॉरिशसमध्ये भव्य स्वागत; ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा)
(हेही वाचा – Haribhau Bagade: ‘बलात्काऱ्यांना नपुंसक करा, छत्रपती शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते’; काय म्हणाले राजस्थानचे राज्यपाल?)
जाडेजाने (Ravindra Jadeja) अंतिम सामन्यांत आपली दहा षटकं संपवल्यानंतर विराट कोहलीला (Virat Kohli) घट्ट मिठी मारली होती. दोघांमध्ये काही सेकंद चर्चाही झाली. जाडेजाने षटकामागे फक्त ३ धावा देत किफायतशीर गोलंदाजी केली होती. त्यानंतर विराट (Virat Kohli) आणि त्याची गळाभेट झाली. त्यातूनच जाडेजाच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली. २०२४ मध्ये रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) टी-२० प्रकारातून निवृत्त झाला आहे. (Champions Return)
A moment of pure joy for #RavindraJadeja! 🏆💙
He expresses his pride in the team and what it feels like to win the tournament! 🙏🔥#ChampionsTrophyOnJioStar #Cricket pic.twitter.com/Jp0Xx0Do7b
— Star Sports (@StarSportsIndia) March 9, 2025
अंतिम फेरीत जाडेजाने १० षटकांत ३० धावा देत धोकादायक लॅथमचा मोलाचा बळी घेतला. तर तर फलंदाजीतही त्याने संघाला गरज असताना ६ चेंडूंत ९ धावा केल्या. सामना जिंकून देणारा विजयी चौकारही जाडेजाच्याच (Ravindra Jadeja) नावावर लागला. तर सामन्यात जाडेजाचं (Ravindra Jadeja) क्षेत्ररक्षणही नेहमीसारखं चपळ होतं. भारतीय संघाने विजय मिळवल्यावर जाडेजाने अगदी संपूर्ण विजयोत्सवात आणि बक्षीस समारंभात आपल्या पायातील पॅड काढले नाहीत. आणि हर्षित राणा (Harshit Rana) तसंच अर्शदीपबरोबर त्याने गंगनम स्टाईल नृत्यही केलं. (Champions Return)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community