Twitter Outage : ट्विटर सतत बंद पडत असल्यामुळे ग्राहक वैतागले

सोमवारी दोनवेळा ट्विटर बंद पडलं होतं.

49
Twitter Outage : ट्विटर सतत बंद पडत असल्यामुळे ग्राहक वैतागले
Twitter Outage : ट्विटर सतत बंद पडत असल्यामुळे ग्राहक वैतागले
  • ऋजुता लुकतुके

इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची सोशल मीडिया साईट ट्विटर सोमवारी दोनदा एक ते दीड तासांसाठी बंद पडली होती. ग्राहकांची त्यामुळे अडचण झाली.  त्यांनी ट्विटरला असे संदेश पाठवायला सुरुवात केली. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता पहिल्यांदा ट्विटर बंद (Twitter Outage) झालं. अर्ध्या तासानंतर ते पुन्हा सुरू झालं. पण, संध्याकाळी साडेसात वाजता ट्विटर आणखी दीड तासांसाठी बंद पडलं होतं. ग्राहकांनी ॲप सुरू होत नसल्याच्या तसंच सर्व्हर कनेक्ट होत नसल्याच्या असंख्य तक्रारी ट्विटरकडे केल्या आहेत.

दिवसभरात डाउन डिटेक्टर वेबसाइटवर ३,००० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या, त्यापैकी १८,००० हून अधिक तक्रारी भारतातून, १८,००० अमेरिकेतून आणि १०,००० हून अधिक तक्रारी यूकेमधून आल्या. (Twitter Outage)

(हेही वाचा – बंगालमधील Jadavpur University मध्ये आझाद काश्मीर आणि फ्री पॅलेस्टाईनची चित्रे; डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेवर संशय)

डाउनडिटेक्टरच्या मते, सुमारे ४१% लोकांना आताही अॅपमध्ये समस्या येत आहेत. त्याच वेळी, ५३% लोकांना वेब अॅक्सेस करण्यात समस्या येत आहेत आणि सुमारे ६% लोकांनी सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या येत असल्याचे नोंदवले आहे. (Twitter Outage)

ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी सायबर हल्ल्याचा दावा केला आहे. तर काही ग्राहकांनी कंपनीने केलेल्या नोकर कपातीकडे लक्ष वेधलं आहे. तांत्रिक समस्या विभागातून अचानक लोकांना काढून टाकल्यामुळे ही वेळ आल्याचं काहींचं म्हणणं आहे.

 

(हेही वाचा – Champions Return : चॅम्पियन्स करंडक विजेता कर्णधार रोहित शर्माचं मुंबईत जोरदार स्वागत)

स्टॅटिस्टाच्या मते, जगभरात एक्सचे सुमारे ३३० दशलक्ष ग्राहक आहेत. अमेरिकेत त्याचे ९.५ कोटी ग्राहक आहेत आणि भारतात २.७ कोटी ग्राहक आहेत. दररोज सुमारे ५० कोटी पोस्ट केल्या जातात. २७ ऑक्टोबर २०२२ रोजी, एलन मस्क यांनी ट्विटर (आता एक्स) खरेदी केले. हा करार ४४ अब्ज डॉलर्समध्ये झाला. आजच्या दरांनुसार, ही रक्कम सुमारे ३.८४ लाख कोटी रुपये आहे.

मस्क यांनी प्रथम कंपनीच्या चार उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले – सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal), वित्त प्रमुख नेड सेगल, कायदेशीर कार्यकारी विजया गड्डे (Vijaya Gadde) आणि शॉन एजेट.

५ जून २०२३ रोजी, लिंडा याकारिनो एक्समध्ये सीईओ म्हणून रुजू झाल्या. त्याआधी, त्या एनबीसी युनिव्हर्सलमध्ये जागतिक जाहिरात आणि भागिदारी विभागाच्या अध्यक्षा होत्या. (Twitter Outage)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.