समाजात जागरुकता वाढल्याने भारतात विमा उद्योग स्थिर गतीने वाढत आहे. परंतु, या क्षेत्राला फसवणुकीच्या (Fraud) प्रकरणांनी चांगले ग्रासलेले दिसते. विमा क्षेत्रात उघडकीस येणारी फसवणुकीची तब्बल ८६ टक्के प्रकरणे जीवन विम्याशी निगडित आहेत. इतर विमा प्रकारांशी निगडित फसवणुकीच्या तुलनेत जीवन विम्यात होणारी फसवणूक सहापटीने अधिक आहे. या फसवणुकीच्या प्रकारांमुळे दरवर्षी विमा उद्योगाला तब्बल ३०,४०१ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे विमा कंपन्यांना आपल्या ८.५ टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. (Life insurance fraud)
दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होऊ लागली आहे. जर हे असेच सुरू राहिले. तर याचा परिणाम केवळ विमा कंपन्यांपुरता (Insurance companies) मर्यादित राहणार नाही. याचा नकारात्मक परिणाम ग्राहकांच्या विश्वासार्हतेवरही पडू शकतो. त्यामुळे या समस्येला आळा घालणे गरजेचे आहे. ही समस्या विमा कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर कमजोर करीत आहे. यामुळे प्रामाणिक ग्राहकांना वाढलेल्या प्रीमियम दरांचा भुर्दंड सोसावा लागतो. हे गैर-जीवन विमा क्षेत्रात (Non-Life Insurance Sectors) होणाऱ्या फसवणुकीपेक्षा जवळजवळ सहापट अधिक आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांचे मॉरिशसमध्ये भव्य स्वागत; ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा)
कशी होते फसवणूक ?
यात चोरटे पॉलिसी अटींच्या अनुकूल परंतु चुकीची वा अर्धवट माहिती देतात. असे केल्याने अधिक कव्हरेज मिळवणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो. चुकीची माहिती देताना आधीचे गंभीर आजार लपवले जातात. उत्पन्न किंवा रोजगाराचा तपशीलही चुकीचा भरला जातो. वय चुकीचे दिले जाते.
तंबाखू, मद्य, ड्रग्जचे सेवन आदी गंभीर सवयी यात लपवल्या जातात…
विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मृत्यूचा बनाव केला जातो. बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर केले जाते. अनेकदा ग्राहकांना बनावट विमा पॉलिसी (Fake insurance policy) विकली जाते. त्यांच्याकडून कव्हरेज नसतानाही जादा प्रीमियम घेतला जातो. दावा करतेवेळी समजते की पॉलिसी वैध नाही.
(हेही वाचा – बंगालमधील Jadavpur University मध्ये आझाद काश्मीर आणि फ्री पॅलेस्टाईनची चित्रे; डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेवर संशय)
घोटाळेबाजांपासून सावध कसे राहावे ?
दाव्यासाठी अनोळखी व्यक्तीचे आलेले मेल, फोन कॉल किंवा मेसेजपासून सावध राहावे. तिचीपडताळणी झाल्याशिवाय तुमची माहिती देऊ नये. विमा एजंटने पॉलिसीबाबत (Policy) दिलेली माहिती तपासून घ्या. एखाद्या तपशिलाबाबत खात्री वाटत नसल्यास थेट कंपनीशी संपर्क साधावा. कोणतीही संशयास्पद कृती वा फसवणूक करणारा संदेश प्राप्त झाल्यास तत्काळ आपल्या विमा कंपनीला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करावी.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community