Mumbai Crime : कारखानदाराकडून १५ लाखाची लाच स्वीकारताना जीएसटी उपायुक्तांसह दोन जणांवर गुन्हा दाखल

487
Mumbai Crime : कारखानदाराकडून १५ लाखाची लाच स्वीकारताना जीएसटी उपायुक्तांसह दोन जणांवर गुन्हा दाखल
Mumbai Crime : कारखानदाराकडून १५ लाखाची लाच स्वीकारताना जीएसटी उपायुक्तांसह दोन जणांवर गुन्हा दाखल

एका इंजिनिअरिंग वर्क्स कारखानदाराकडून १५ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्यातील जीएसटी उपायुक्तांसह एका खाजगी व्यक्तीविरुद्ध मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात (Sahar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिक तपास सुरू आहे. (Mumbai Crime)

तात्यासाहेब विनायक ढेरे (Tatyasaheb Vinayak Dhere) आणि एकनाथ भिकू पेडणेकर (Eknath Bhiku Pednekar) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जीएसटी उपायुक्त आणि खाजगी इसमाचे नाव आहे. तात्यासाहेब ढेरे हे वस्तू व सेवा कर पालघर विभागाचे उपायुक्त आहे. वसई येथे राहणारे तक्रारदार यांचा विरार येथे इंजिनिअरिंग वर्क्स वॉटर प्लांट तयार करण्याची मशीन बनविण्याचा कारखाना आहे. तक्रारदार यांचे म्हणणे आहे की, ते प्रत्येक तीन महिन्यांनी जीएसटी (GST)  भरतात, काही पुरवठादार जीएसटी (GST) भरत नाही, त्यांचा देखील जीएसटी आम्ही भरतो,मात्र काही पुरवठादार यांनी जीएसटी भरले नव्हते, ते आमच्या लक्षात खूप उशिरा आले, आम्ही हे जीएसटी (GST) भरणारच होतो, तो पर्यत जीएसटी आणि त्याच्यावरील दंड असा जवळपास ५५ लाख जीएसटीचा भरणा करण्यासाठी जीएसटी अधिकारी यांनी सांगितले. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पात भाजपाच्या मंत्र्यांच्या विभागाला जास्त निधी; दुसऱ्या क्रमांकावर पवार गटाचे मंत्री त्यामुळे शिंदे गटांमध्ये अस्वस्थता?)

१० टक्के रक्कम भरून अपिलात जाऊन उर्वरित रक्कम भरण्यासाठी वेळ मागून घ्या असेही जीएसटी अधिकारी यांनी सांगितले, त्यानुसार आम्ही १० टक्के रक्कम भरून अपिलात गेलो होतो असे तक्रारदार यांनी आपल्या जबाबात सांगितले. त्यानंतर देखील जीएसटी अधिकारी यांनी आम्हाला १३ लाख रोख द्या आणि १२ लाख जीएसटी (GST) मध्ये जमा करा त्यानंतर आम्ही आदेश देऊ, दहा दिवसांत रक्कम दिली नाही तर घर आणि कारखाना सील करण्यात येईल असे जीएसटी अधिकारी यांनी सांगितले असल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे. या तक्रारीची दखल लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी घेत, तक्रारदार यांना जीएसटी अधिकारी यांना लाचेची रक्कम घेण्यासाठी जागा निश्चित करण्यास सांगितले, जीएसटी उपायुक्त ढेरे (Tatyasaheb Vinayak Dhere) यांनी खाजगी इसम पेडणेकर याच्या मदतीने अंधेरी पूर्व चिमटपाडा येथील एका हॉटेलात लाचेची रक्कम घेऊन बोलावले. (Mumbai Crime)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर ठिकाणी सापळा लावण्यात आला होता, तक्रारदार हे लाचेची रक्कम घेऊन हॉटेल मध्ये गेले, दरम्यान ढेरे आणि तक्रारदार यांच्यात चर्चा होऊन लाचेची रक्कम खाजगी इसम पेडणेकर यांना देण्यास सांगून ढेरे हे हॉटेलमधून बाहेर पडले, दरम्यान लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खाजगी इसम पेडणेकर याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात जीएसटी उपायुक्त ढेरे (Tatyasaheb Vinayak Dhere) आणि खाजगी इसम पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.