
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात कोळसा खाणीच्या उत्खननासाठी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर केला जात असून, अरविंदो कंपनीने (Aurobindo company) तीन गावांचे पुनर्वसन न करता थेट खाणीचे काम सुरू केल्याचा आरोप काँग्रेस (Congress) विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विधानसभेत केला. या कामामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, घरांना तडे गेले, शेतीचे नुकसान झाले आणि गावातील रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी खणीकर्म मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी संबंधित कंपनीला अटी-शर्तींचे पालन करून पुनर्वसन करण्याचे लेखी आदेश देऊ, असे विधानसभेत आश्वासन दिले. (Chandrapur)
( हेही वाचा : Dahanu समुद्रात सापडले नवे तेलसाठे)
गावकऱ्यांचे हाल; खाणीच्या स्फोटामुळे घरांना तडे, रस्त्यांचीही वाताहत
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अरविंदो कंपनीच्या (Aurobindo company) कामामुळे स्थानिकांना भोगावे लागणारे हाल मांडले. रात्री उशिरापर्यंत ब्लास्टिंग केल्यामुळे नागरिक झोपू शकत नाहीत. या खाणकामामुळे घरांना मोठे तडे गेले असून, गावातील जिल्हा परिषदेचे रस्तेही खोदून ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याबद्दल कोणताही मोबदला मिळालेला नाही.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीचे काम बंद करण्याचे आदेश दिले होते, मात्र वरीष्ठ स्तरावरून आलेल्या दबावामुळे काम पुन्हा सुरू करण्यात आले, असा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
खणीकर्म मंत्र्यांचे आश्वासन: लवकरच पुनर्वसनाचा निर्णय
या मुद्द्यावर उत्तर देताना खणीकर्म मंत्री शंभूराजे देसाई यांनी संबंधित कंपनीने जर अटी-शर्तींचे पालन केले नसेल, तर पुनर्वसन करण्याचे आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले. पुनर्वसन न झाल्यास ठरावीक कालमर्यादेत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
खाणींमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर
विधानसभेत काही लोकप्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमुळे पाण्याचे स्रोत कमी झाल्याची तक्रार मांडली. त्यावर मंत्री देसाई यांनी यासंबंधी लवकरच सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
स्थानीय लोकांमध्ये रोष, त्वरित उपाययोजना करण्याची मागणी
अरविंदो कंपनीच्या (Aurobindo company) खाणकामामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून, त्यांच्या पुनर्वसनासह नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. सरकारने त्वरित योग्य ती पावले उचलून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. (Aurobindo company)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community