Chembur आणि घाटकोपर पंतनगरमधील कचरा वर्गीकरण केंद्र कसे चालले? अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांनी केली केंद्रांची पाहणी

436
Chembur आणि घाटकोपर पंतनगरमधील कचरा वर्गीकरण केंद्र कसे चालले? अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांनी केली केंद्रांची पाहणी
Chembur आणि घाटकोपर पंतनगरमधील कचरा वर्गीकरण केंद्र कसे चालले? अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांनी केली केंद्रांची पाहणी

उगमस्‍थानी घनकच-याचे संकलन आणि वर्गीकरण करण्‍यासाठी महानगरपालिकेची सुका कचरा वर्गीकरण केंद्र कार्यान्वित असून चेंबूर (Chembur) म्हैसूर वसाहत आणि घाटकोपर पंतनगर येथील कचरा वर्गीकरण केंद्राची पाहणी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) चेंबूर येथील म्‍हैसूर वसाहतीनजीकचे सुका कचरा वर्गीकरण केंद्र, घाटकोपर (Ghatkopar) (पूर्व) येथील पंतनगर सुका कचरा वर्गीकरण केंद्र आणि बाळ धारप उड्डाणपुलाखालील सुका कचरा वर्गीकरण केंद्र आदींना अतिरिक्‍त महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांनी मंगळवारी भेट देवून तेथील कचऱ्यांवर शास्त्रोक्त प्रक्रियेची पाहणी केली.

( हेही वाचा : Chandrapur मधील अरविंदो कंपनीने पुनर्वसन न करता खाणकाम सुरू केले; खणीकर्म मंत्र्यांकडून लेखी आदेश देण्याचे आश्वासन

कचरा वर्गीकरण कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेत ओला व सुका कचरा वर्गीकरणात सुधारणा आणण्याबाबत जोशी यांनी आवश्यक ते निर्देश संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी, कार्यकारी अभियंता, प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मुंबईत (Mumbai) दरदिवशी सुमारे सरासरी ५८०० ते ६२०० मेटीक टन एवढा कचरा निर्माण होतो. यामध्ये सुमारे ८०० मेटीक टन एवढे डेब्रीज असते. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंडवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उगमस्थानीच सुका कचरा वर्गीकरण करणे आवश्यक असल्याने मुंबईत (Mumbai) अनेक ४६ सुका कचरा वर्गीकरण केंद्र बनवण्यात आले आहे. त्यामुळे सुका कचरा वर्गीकरण करुन बाजुला केल्यास डम्पिंग ग्राऊंडवर जाणाऱ्या ओल्या कचऱ्याचे प्रमाणही कमी होईल, याच हेतून अशाप्रकारचे कचरा वर्गीकरणाचे केंद्र बनवण्यात आले आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.