‘पीओपी’बाबत राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग तज्ञ समिती मार्फत अभ्यास करणार; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

62
'पीओपी'बाबत राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग तज्ञ समिती मार्फत अभ्यास करणार; मंत्री आशिष शेलार यांची माहिती
'पीओपी'बाबत राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग तज्ञ समिती मार्फत अभ्यास करणार; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

पीओपीच्या (POP) गणेशमूर्ती वापराबाबत स्पष्टता यावी म्हणून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग (Rajiv Gandhi Science and Technology Commission) तज्ञ समिती मार्फत अभ्यास करणार आहे. तसेच शासन मुर्तीकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून येत्या 20 तारखेला शासन न्यायालयात भूमिका मांडेल त्यासाठी आवश्यक तज्ञ वकील शासन देईल, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी आज येथे दिली. पीओपी बंदीच्या विरोधात राज्यातील विविध संघटनांनी परेल येथील नरे पार्क मध्ये आयोजित मुर्तीकार संमेलनात ते बोलत होते.

( हेही वाचा : Matunga मध्ये ५४ बेवारस वाहने हटवली; १५४ वाहनांना नोटीस; रोबोटिक वाहनतळ कधी बनणार?

पीओपी बाबत संभ्रम दूर व्हावा म्हणून मंत्री ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला पत्र लिहून याबाबत तज्ञ समिती गठीत करुन सर्वंकष अभ्यास करण्याची विनंती केली होती. या विषयात आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी या विषयातील तज्ञ समिती गठीत करुन अहवाल देण्यात येईल असे, आजच शासनास कळवले आहे. याबाबतची माहिती देत ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी आज गणेश मुर्तीकारांना संबोधित केले. यावेळी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह राज्यभरातील मुर्तीकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पीओपी गणेशमूर्ती व यावर विसंबून असलेला कारागीरांचा रोजगार तसेच त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने राज्यातील रोजगार व आर्थिक दृष्ट्या हा विषय महत्त्वाचा आहे. तसेच उत्सवाची परंपरा मोठी असून कला, संस्कृती यांच्याशी हा विषय जोडलेला आहे त्यामुळे ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि दहिहंडी उत्सवाची परंपरा धोक्यात आली तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार उत्सवांच्या पाठीशी उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षात हिंदू सणांच्या विरोधात एक एक षडयंत्र रचले जात असून त्याचे संदर्भ देत आशिष शेलार यांनी हे षडयंत्र हाणून पाडू असे ही स्पष्ट केले. मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) गेल्या काही वर्षात मुर्तीकरांच्या विरोधात भूमिका घेते आहे, अशी टीका ही आशिष शेलार यांनी केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.