Crime : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीतून ७ जणांची सुटका, कथित प्राध्यापकाला अटक

64
Crime : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीतून ७ जणांची सुटका, कथित प्राध्यापकाला अटक
Crime : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीतून ७ जणांची सुटका, कथित प्राध्यापकाला अटक

हरियाणातील (Haryana) आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा (International human trafficking racket) पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले आहे. मानवी तस्करी रॅकेटमधील कथित प्राध्यापकाला अटक करण्यात आली असून लंडन येथे पाठविण्यात येणाऱ्या ७ विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे.सुटका करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३ विद्यार्थी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हरियाणातील (Haryana) मानवी तस्करी करणारी टोळी विद्यार्थ्यांकडून मोठ्या रकमा घेऊन त्यांना लंडन तसेच इतर देशांमध्ये पाठवले जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.

( हेही वाचा : Chembur आणि घाटकोपर पंतनगरमधील कचरा वर्गीकरण केंद्र कसे चालले? अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांनी केली केंद्रांची पाहणी

विजेंद्रकुमार सिंग (Vijender Kumar Singh) असे अटक करण्यात आलेल्या कथित प्राध्यापकाचे नाव आहे.१० मार्च रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विजेंद्रकुमार (Vijender Kumar Singh) हा ७ विद्यार्थ्यांना घेऊन एस.व्ही. ७७३ आणि एस.व्ही.११९या विमानाने जेद्दा मार्गे लंडनला घेऊन जाणार होता, दरम्यान इमिग्रेशन काउंटरवर तपासणी दरम्यान मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या इमिग्रेशन अधिकारी यांना बोर्डिंग पास, व्हिसा तपासणीदरम्यान संशय आल्याने त्यांनी विजेंद्रकुमार सिंग (Vijender Kumar Singh) सह आठही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता सर्व जण तपासणी सुरू असताना मुंबई पोलीस विभागाच्या विशेष शाखेचे पोलीस अधिकारी भटू वाळके यांनी प्रवाशाचे पासपोर्ट, व्हिसा तपासले असताना त्यांना संशय आल्याने त्यांनी आठ संशयित प्रवाशाकडे चौकशी केली असता हरियाणा हिसार येथील ओम स्टर्लिंग ग्लोबल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असून विजेंद्र (Vijender Kumar Singh) हे प्राध्यापक असल्याचे सांगितले, आणि सर्व जण लंडन येथील ‘स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम अटेंड करण्यासाठी निघालो असल्याची माहिती दिली. परंतु त्यांच्या माहितीत तफावत असल्याचे आढळून आल्याने, अधिकारी यांनी युके दूतावास यांच्याकडे प्रवाशाच्या विझिट व्हिसाची चौकशी केली असता, हे व्हिसा बनावट कागदपत्रे सादर करून बनविले गेल्याचे समोर आले.

विशेष शाखेचे इमिग्रेशन अधिकारी यांनी कथित प्राध्यापकसह आठही जणांना सहार पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्यांनी लंडन येथे स्थायिक होण्यासाठी बिट्टू नावाच्या एजंटला प्रत्येकी २० लाख रुपये दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यानंतर एजंट बिट्टू याने हरियाणा हिसार येथील ओम स्टर्लिंग ग्लोबल युनिव्हर्सिटी (OM Sterling Global University) मध्ये शिक्षण घेत असल्याचे भासवून तसेच लंडन येथे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम अटेंड करण्यासाठी जात असल्याचे भासवून लंडन देशाचा विझिट व्हिसा मिळवून दिला अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

प्राधिकरण अधिकारी यांनी युके दूतावास यांच्याकडे विझिट व्हिसा बाबत अधिक माहिती मिळवली असता व्हिसा बनावट कागदपत्रे जोडून मिळवला असल्याची माहिती समोर आली.दरम्यान विशेष शाखेचे अधिकारी यांनी प्राध्यापकासह ८ प्रवाशाना जणांना ताब्यात घेऊन सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हे प्रकरण किचकट असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाकडे सोपविण्यात आले आहे.मालमत्ता कक्षाने या प्रकरणी प्राध्यापक विजेंद्र सिंग याला अटक केली असून ताब्यात घेण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांना सोडण्यात आले आहे, त्यातील ३ विद्यार्थी अल्पवयीन असून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. हे मानवी तस्करीचे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरले असून गुन्हे शाखेकडून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.