
-
ऋजुता लुकतुके
येत्या जून महिन्यात इंग्लंडच्या लॉर्ड्सवर (lord’s) आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (ICC Test Championship 2025) अंतिम सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) संघ यात एकमेकांसमोर असतील. तर भारतीय संघ न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या मालिका गमावल्यानंतर अंतिम फेरीतून बाद झाला होता. याचा फटका आता आयोजक म्हणून लॉर्ड्सला (lord’s) बसणार आहे. मैदानाचा जवळ जवळ ४५ कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. इंग्लंडमधील प्रतिष्ठित टाईम समुहाने हा आकडा एका बातमीत दिला आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लब या सामन्याचं आयोजन करणार आहे. पण, भारतीय संघ नसल्यामुळे सामन्याला मिळणारा प्रतिसाद थंड असेल असं क्लबला वाटतंय.
२०२३ आणि २०२४ मधील कसोटीतील कामगिरी अंतिम फेरीसाठी गृहित धरायची होती. भारतीय संघ जून २०२४ पर्यंत गुणतालिकेत अव्वल होता. पण, त्यानंतर बांगलादेशविरुद्ध दोन सलग कसोटी भारताने जिंकल्या. न्यूझीलंडविरुद्धची मायदेशातील मालिका मात्र संघाने ०-३ ने गमावली. त्यानंतर चक्र पार उलटं फिरलं. लागोपाठ ऑस्ट्रेलियातील ५ कसोटींच्या मालिकेतही भारताचा १-३ ने पराभव झाला. अखेर भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (ICC Test Championship 2025) अंतिम फेरी गाठता आली नाही.
(हेही वाचा – WFI Ban Lifted : क्रीडा मंत्रालयाने कुस्ती फेडरेशनवरील बंदी हटवली, संजय सिंग यांच्याकडे सूत्र)
भारतीय संघ अंतिम फेरीत खेळेल अशी शक्यता असल्यामुळे मेरिलबोन क्रिकेट क्लबने सुरुवातीला लोकांची गर्दी होणार असं गृहित धरून तिकिटाचे दर चढे ठेवले होते. पण, भारतीय संघ नाही हे स्पष्ट झाल्यावर आता क्लबने दर कमी केले आहेत. आणि त्यामुळे अपेक्षित महसूलातही घट होणार आहे. मैदानात प्रेक्षकांनी यावं यासाठी तिकीट दर कमी करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना लॉर्ड्सवर (lord’s) फक्त ९,००० लोक कसोटी पाहण्यासाठी आले. त्यानंतर चढ्या दरांमुळे लोक आले नाहीत, अशी टीका मेरिलबोन क्लबवर झाली.
त्यामुळे क्लब आता तिकीट दरांच्या बाबतीत संवेदनशील झाला आहे. जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. आणि तेव्हा लॉर्ड्सवर (lord’s) होणारी कसोटी आधीच हाऊसफुल्ल झाली आहे. पण, आयसीसी अजिंक्यपदाच्या कसोटीला (ICC Test Championship 2025) लोक जमणार की नाही, याची भीती सध्या क्लबला वाटतेय. भारतातील क्रिकेटची लोकप्रियता त्यामुळे अधोरेखित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community